माही वीजशी घटस्फोटानंतर 'मिस्ट्री गर्ल'सोबत दिसला जय भानुशाली, पण ती आहे 'बहीण'?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2026 15:05 IST2026-02-16T15:04:34+5:302026-02-16T15:05:34+5:30
कोण आहे ही मिस्ट्री गर्ल?

माही वीजशी घटस्फोटानंतर 'मिस्ट्री गर्ल'सोबत दिसला जय भानुशाली, पण ती आहे 'बहीण'?
जय भानुशाली आणि माही वीज या लोकप्रिय जोडप्याने ८ जानेवारी रोजी घटस्फोटाची घोषणा केली. त्यापूर्वी काही दिवसांपासून त्यांच्या घटस्फोटाच्या चर्चा सुरुच होत्या. हे कपल का वेगळं झालं याचं कारण समोर आलं नाही. आम्ही अजूनही चांगले मित्र आहोत अशी प्रतिक्रिया माहीने दिली होती. तर आता जय भानुशाली एक मिस्ट्री गर्लसोबत दिसल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालाय. दोघं रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चाही लगेच सुरु झाल्या. कोण आहे ती?
जय भानुशालीसोबत व्हिडीओमध्ये दिसत असलेली ती मायेशा अय्यर आहे. बिग बॉस १५ मध्ये दोघंही दिसले होते असं नंतर समोर आलं. जय नुकताच मायेशासोबत एका इव्हेंटमधून बाहेर पडताना दिसला. यावेळी मायेशाने डीप नेक ब्रालेट टॉप फ्लेअर्ड टॉप आणि क्रीम रंगाची लूज पँट परिधान केली होती. या लूकमध्ये ती सुंदर दिसत आहे. तर जय व्हाईट शर्ट आणि ब्लू जीन्स अशा साध्या लूकमध्ये होता. दोघं कारची वाट पाहत गप्पा मारत उभे होते. नंतर कार आल्यावर दोघं एकत्र कारमध्ये बसून गेले.
या व्हिडीओवर एकाने कमेंट करत लिहिले, 'बिग बॉसमध्ये तर जयने हिला भाऊ म्हटलं होतं'. 'जय असं करेल कधी वाटलं नव्हतं' अशीही कमेंट एका नेटकऱ्याने केली आहे. जय आणि मायेशा बिग बॉस १५ मध्ये बहीण भावासारखे होते. तिने जयला राखीही बांधली होती. त्यामुळे दोघांमध्ये काहीही नाही असं म्हणत चाहत्यांनी जयची बाजू घेतली आहे.
जय आणि माही वीज यांनी २०११ साली लग्न केलं होतं. त्याआधी अनेक वर्ष ते एकमेकांना डेट करत होते. २०१७ साली त्यांनी खुशी आणि राजवीर या दोन मुलांना दत्तक घेतलं. तर २०१९ साली त्यांना तारा ही मुलगी झाली. घटस्फोटानंतरही दोघं एकत्र मुलांचा सांभाळ करणार असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली होती.