ईशा मालवीय बनली 'मराठी मुलगी', व्हिडीओ पाहून तुम्हीही म्हणाल "लय भारी"
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2025 15:36 IST2025-12-21T15:26:09+5:302025-12-21T15:36:10+5:30
ईशाचा मराठमोळा स्वॅग! साडी, नाकात नथ आणि 'पिंगा' गाण्यावरचा डान्स पाहून चाहते झाले घायाळ

ईशा मालवीय बनली 'मराठी मुलगी', व्हिडीओ पाहून तुम्हीही म्हणाल "लय भारी"
'बिग बॉस सीझन १७' मुळे घराघरांत पोहोचलेली लोकप्रिय अभिनेत्री ईशा मालवीय कायम चर्चेत असते. आताही तिनं चाहत्यांचं लक्ष वेधलं आहे. पण, यावेळी ग्लॅमरस फोटोंमुळे नाही, तर एका अस्सल मराठमोळ्या लूकमुळे ती सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे. ईशाने साडी परिधान करून आपला 'मराठी मुलगी' अवतार चाहत्यांसमोर सादर केलाय. तिचा हा मराठमोळा स्वॅग पाहून नेटकरी घायाळ झाले आहेत.
ईशाने सोशल मीडियावर डान्सचा एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्याला तिने ’मराठी मुलगी’ असे कॅप्शन दिले आहे. या व्हिडिओमध्ये ती 'बाजीराव मस्तानी' चित्रपटातील प्रसिद्ध 'पिंगा' गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. तिचे हावभाव आणि तिचा मराठमोळा लूक पाहून ती खरोखरच एखादी मराठी मुलगी असल्याचे भासतंय.
ईशानं आपल्या मराठमोळ्या लूकसाठी गडद मरून रंगाची नऊवारी साडी नेसली. तर गळ्यातील सुंदर चोकर, मोत्यांची माळ आणि नाकातली नथ ईशाच्या सौंदर्यात भर घालत होती. कमरेला घातलेल्या पारंपरिक कंबरपट्ट्यामुळे तिचा हा लूक अधिकच उठावदार आणि राजेशाही वाटला. केसांचा अंबाडा आणि त्यावर गजरा माळून ईशानं आपला लूक पुर्ण केला. ईशाचा हा लूक व्हायरल होताच चाहत्यांनी त्यावर कमेंट्सचा वर्षाव केला आहे.