'इंडियन आयडॉल 3'चा विजेता प्रशांत तमांगचं निधन कशामुळे झालं? पत्नीने सांगितलं काय घडलं; म्हणाली-"झोपेत असताना…"
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2026 12:10 IST2026-01-12T11:57:11+5:302026-01-12T12:10:54+5:30
झोपेत असताना काळाचा घाला! 'इंडियन आयडॉल 3'चा विजेता प्रशांत तमांगचा मृत्यू कशामुळे झाला? कारण आले समोर

'इंडियन आयडॉल 3'चा विजेता प्रशांत तमांगचं निधन कशामुळे झालं? पत्नीने सांगितलं काय घडलं; म्हणाली-"झोपेत असताना…"
Prashant Tamang Death: इंडियन आयडॉलच्या तिसऱ्या पर्वातून घराघरात पोहोचला गायक, अभिनेता प्रशांत तमांग याचं काल ११ जानेवारी रोजी निधन झालं. त्याच्या निधनाची बातमी ऐकताच चाहत्यांना धक्काच बसला आहे. नवी दिल्ली
येथील राहत्या घरी गायकाची प्राणज्योत मालवली. वयाच्या ४३ व्या वर्षी त्याने अखेरचा श्वास घेतला. दरम्यान, प्रशांत तमांगचं निधन हार्ट अटॅकमुळे झाल्याची माहिती समोर आली होती. मात्र, याविषयी अधिकृत वैद्यकीय तपशील समोर आलेला नव्हता.
आता गायकाच्या मृत्यूच कारण स्पष्ट झालं आहे.
अलिकडेच प्रशांत तमांगची पत्नी मार्थाने एएनआयशी संवाद साधला. त्यादरम्यान, जगभरातून मिळणार भावनिक सपोर्ट पाहून तिने कृतज्ञता व्यक्त केली.ती म्हणाली, "तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार. मला जगभरातून फोन येत आहेत.लोक माझ्या घराबाहेर उभे आहेत, आणि काही लोक त्यांना शेवटचे पाहण्यासाठी रुग्णालयात आले होते. हा माझ्यासाठी खरोखरच एक भावनिक क्षण आहे, आणि कृपया तुम्ही त्यांच्यावर आधीसारखंच प्रेम करत राहा. ते एक महान आत्मा होते, ते एक सज्जन माणूस होते.मला खात्री आहे की तुम्ही त्यांना कायम
स्मरणात ठेवाल."
काय होतं गायकाच्या मृत्यूचं कारण...
गायक, अभिनेता प्रशांत तमागच्या आकस्मिक निधनाने सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे. मात्र, त्याच्या मृत्यूनंतर अनेक अफवा सोशल मीडियावर पसरवण्यात आला. याबद्दल बोलताना त्यांची पत्नी म्हणाली, 'तो एक नैसर्गिक मृत्यू होता. झोपेत असतानाच त्यांचं निधन झालं. त्यावेळी मी त्यांच्या अगदी शेजारीच होते." अशी माहिती अभिनेत्याच्या पत्नीनं दिली आहे.
नेमकं काय घडलेलं?
हृदयविकाराचा झटका आल्यानंतर प्रशांत तमांगला दिल्लीतील द्वारका येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. परंतु, तोपर्यंत खूपच उशीर झाला होता. रुग्णालयात त्याला घेऊन गेल्यानंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. यापुर्वी तो अरुणाचल प्रदेशमध्ये एका कार्यक्रमाहून परतला होता. त्यानंतर दिल्लीतील राहत्या घरी ही धक्कादायक घटना घडली.
मुळचा दार्जिलिंगचा रहिवासी असलेल्या प्रशांतने २००७ मध्ये इंडियन आयडॉल जिंकण्यापूर्वी पश्चिम बंगाल पोलीस ऑर्केस्ट्रासोबत आपल्या प्रवासाला सुरुवात केली होती.नंतर, त्याने अभिनय क्षेत्रात प्रवेश केला. 'पाताल लोक- २' सारख्या गाजलेल्या हिंदी वेब सीरिजमध्ये काम केलं आहे.