भाई चल क्या रहा हैं? पवनदीपच्या बहिणीच्या लग्नात कुटुंबाप्रमाणे वावरत होती अरुणिता; video होतोय व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2022 15:09 IST2022-02-11T15:08:33+5:302022-02-11T15:09:26+5:30
Arunita kanjilal: ही जोडी अनेकदा एकत्र स्पॉट झाली आहे. त्यामुळे या दोघांच्या रिलेशनशीपची सध्या नेटकऱ्यांमध्ये जोरदार चर्चा आहे.

भाई चल क्या रहा हैं? पवनदीपच्या बहिणीच्या लग्नात कुटुंबाप्रमाणे वावरत होती अरुणिता; video होतोय व्हायरल
इंडियन आयडॉल १२ या रिअॅलिटी शोच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेली जोडी म्हणजे पवनदीप राजन आणि अरुणिता कांजीलाल. हा शो संपल्यापासून ही जोडी अनेकदा एकत्र स्पॉट झाली आहे. त्यामुळे या दोघांच्या रिलेशनशीपची सध्या नेटकऱ्यांमध्ये जोरदार चर्चा आहे. यामध्येच अलिकडेच पवनदीपच्या बहिणीचं लग्न झालं. या लग्नात अरुणिता त्याच्या कुटुंबीयांप्रमाणे सर्वत्र वावरत होती. त्यामुळे पुन्हा एकदा नव्या चर्चांना उधाण आलं आहे.
काही दिवसांपूर्वीच उत्तराखंडमधील चंपावत येथे पवनदीपच्या बहिणीचा लग्नसोहळा पार पडला. या सोहळ्यात अरुणितानेदेखील हजेरी लावली होती. विशेष म्हणजे या लग्नसोहळ्यातील प्रत्येक कार्यात तिची उपस्थिती असल्यामुळे नेटकऱ्यांचं लक्ष पुन्हा या जोडीकडे वेधलं आहे.
पवनदीपच्या फॅनपेजवर त्याच्या बहिणीच्या लग्नाचे अनेक फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या व्हिडीओमध्ये अनेक ठिकाणी अरुणिता दिसून येत आहे. इतकंच नाही तर पवनदीपच्या घरातलेदेखील तिला कुटुंबाचा एक भाग असल्याप्रमाणे वागवत आहेत. त्यामुळे नक्कीच या जोडीमध्ये काहीतरी खास नातं असल्याचं म्हटलं जात आहे.
दरम्यान, मध्यंतरी ही जोडी एका म्युझिक अल्बममुळे चर्चेत आली होती. यावेळी या दोघांच्या अफेअरच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. त्यामुळे अरुणिताने हा म्युझिक अल्बम अर्ध्यावरच सोडल्याचं सांगण्यात येतं.