Indian Idol 12 : अमित कुमार नाराज होते तर त्यांनी तेव्हाच सांगायचं होतं...! आदित्य नारायण अखेर बोलला
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2021 15:48 IST2021-05-12T15:47:25+5:302021-05-12T15:48:10+5:30
‘इंडियन आयडल 12’च्या गेल्या वीकेंडमध्ये प्रसारित ‘किशोर कुमार स्पेशल’ एपिसोडवरून सध्या रान माजले आहे. आता आदित्य नारायणने अमित कुमार यांच्या आरोपांना उत्तर दिले आहे.

Indian Idol 12 : अमित कुमार नाराज होते तर त्यांनी तेव्हाच सांगायचं होतं...! आदित्य नारायण अखेर बोलला
‘इंडियन आयडल 12’ (Indian Idol 12 ) हा शो सध्या एका विशेष कारणाने चर्चेत आहे. होय, शोचा टीआरपी घसरला आहे. त्यातच गेल्या वीकेंडच्या किशोर कुमार (Kishore Kumar) स्पेशल एपिसोडमुळे शोवर जबरदस्त टीका सुरू आहे. नेहा कक्कर आणि हिमेश रेशमिया यांना किशोर कुमार यांची गाणी गायली आणि लोकांनी या दोन्ही जजेसला ट्रोल करणे सुरू केले. इतके कमी की काय म्हणून या एपिसोडमध्ये स्पेशल गेस्ट बनून आलेले किशोर कुमार यांचे पुत्र अमित कुमार यांनीही ‘इंडियन आयडल 12’ पोलखोल केली. शूट सुरु होण्यापूर्वीच मला स्पर्धकांचे कौतुक करायचे आहे, असे सांगण्यात आले आणि मी तेच केले, असे सांगत अमित कुमार (Amit Kumar) यांनी सर्वांना धक्का दिला. आता त्यांच्या या विधानावर ‘इंडियन आयडल 12’ चा होस्ट आदित्य नारायण (Aditya Narayan) याने प्रतिक्रिया दिली आहे.
‘स्पॉटबॉय’ला दिलेल्या मुलाखतीत आदित्य नारायण याने अमित कुमार यांच्या आरोपांना उत्तर दिले.
काय म्हणाला आदित्य?
माझ्या मनात अमित कुमार यांच्याबद्दल अपार आदर आहे. पण एक गोष्ट मी नक्की म्हणेल की, दोन तासात एका लीजेंड सिंगरला ट्रिब्युट देणे वाटते तितके सोपे नाही. आम्ही नेहमीच बेस्ट देण्याचा प्रयत्न केला आहे. कोरोना महामारीमुळे मुंबईत शूटींग बंद आहे, आम्ही दमणला शूट करत आहोत. मर्यादित रिसोर्स आणि अगदी कमी क्रूसोबत आम्ही काम करत आहोत. आमचे रिहर्सल्सही लिमिटेड झाले आहेत.सेट नवा आहे. अन्य दुस-या चॅनलवर अनेक शो जुने एपिसोड दाखवत असताना आम्ही मात्र दर आठवड्याला नवीन एपिसोड देत आहोत. आमच्यावतीने आम्ही बेस्ट देण्याचा प्रयत्न करत आहोत, असे आदित्य म्हणाला.
अमितजींनी आधी सांगायचे होते...
अमितजी याआधीही अनेकदा आमच्या शोमध्ये आले आहेत. प्रत्येकवेळी त्यांनी खूप एन्जॉस केले. या एपिसोडमध्येही त्यांनी किशोर दांच्या अनेक आठवणी, त्यांचे अनेक किस्से शेअर केलेत. स्पर्धकांचे कौतुक केले. शूट सुरु असताना काही गोष्टींबद्दल त्यांची नाराजी होती तर त्यांनी तेव्हाच ती सांगायला हवी होती, कदाचित त्यांच्या सल्ल्यानुसार आम्ही ऐनवेळी काही बदलही केले असते, असेही आदित्य म्हणाला.
अमित कुमार यांनी केली पोलखोल
ई-टाईम्सशी बोलताना अमित कुमार यांनी ‘इंडियन आयडल 12’च्या किशोर कुमार स्पेशल एपिसोडवर प्रतिक्रिया दिली. ‘हा एपिसोड पाहूल लोक संतापले आहेत, हे मला माहित आहे. किशोर कुमारसारखे कुणीच गाऊ शकत नाही, हे सत्य आहे. आजच्या तरूणांना किशोर कुमार यांच्याबद्दल काहीही माहित नाही. त्यांना फक्त रूप तेरा मस्ताना हे गाणे माहित आहे. मी ‘इंडियन आयडल 12’च्या एपिसोडमध्ये गेलो आणि मला जे काही करायला सांगितले होते, तेच मी केले. सर्वांची भरभरून प्रशंसा करण्यास मला सांगितले होते. स्पर्धकांनी कसाही परफॉर्मन्स दिला तरी त्यांना प्रोत्साहन म्हणून त्यांची प्रशंसा करा, असे मला सांगितले गेले होते. मी तर अॅडव्हान्समध्ये स्क्रिप्टही मागितली होती. पण त्यांनी ती दिली नाही,’ असे ते म्हणाले.