"मुलं जन्माला घालण्याची कसली घाई होती", अभिनेत्रीला ऐकावे लागले लोकांचे टोमणे; सांगून टाकलं मनातलं दु:ख

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2025 11:36 IST2025-07-30T11:33:36+5:302025-07-30T11:36:20+5:30

मुलांची फी भरण्यासाठी पैसे नव्हते म्हणून अभिनेत्रीला ऐकावे लागले लोकांचे टोमणे; सांगून टाकलं मनातलं दु:ख, म्हणाली...

hindi television actress urvashi dholakia open up about people used to taunt for having children | "मुलं जन्माला घालण्याची कसली घाई होती", अभिनेत्रीला ऐकावे लागले लोकांचे टोमणे; सांगून टाकलं मनातलं दु:ख

"मुलं जन्माला घालण्याची कसली घाई होती", अभिनेत्रीला ऐकावे लागले लोकांचे टोमणे; सांगून टाकलं मनातलं दु:ख

Hini Television Actress Urvashi Dholakia: 'कसौटी जिंदगी की' या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे उर्वशी ढोलकिया. वेगवेगळ्या हिंदी मालिकांमध्ये खलनायिकेच्या भूमिका साकारुन तिने प्रेक्षकांच्या मनात हक्काची जागा निर्माण केली. उर्वशी ढोलकियाला कोमोलिका म्हणूनही ओळखलं जातं. मात्र, ही अभिनेत्री तिच्या कामासह वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत राहिली आहे.उर्वशीचं वयाच्या १६ व्या वर्षीच लग्न झालं होतं. १७ व्या वर्षी ती गरोदर राहिली. उर्वशीने जुळ्या मुलांना जन्म दिला. मात्र मुलांच्या जन्मानंतरही तिचा पती कोणतीच जबाबदारी घेत नसल्याने तिने वयाच्या १८ व्या वर्षीच घटस्फोट घेतला. अशातच एका मुलाखतीमध्ये लोकप्रिय टीव्ही अभिनेत्रीने तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल खुलासे केले आहेत.

उर्वशी ढोलकियाने 'hutterfly 'ला दिलेल्या मुलाखतीदरम्यान खुलासा केला होता की, तिच्या मुलांवरुन तिला अनेकांना टोमणे मारले होते. शिवाय या मुलाखतीने उर्वशीने तिच्या पहिल्या पतीपासून घटस्फोट घेतल्यानंतर सिंगल मदर म्हणून तिच्या मुलांना कसं वाढवलं याबद्दल उघडपणे सांगितलं. त्याबद्दल बोलताना अभिनेत्री म्हणाली, "मला त्यावेळी मुलांची शाळेची फी  भरण्यासाठी ३ हजार रुपयांची गरज होती. तेव्हा मी एक पायलट एपिसोड शूट केला होता. त्यामुळे त्यांनी सांगितलं की जर तो पायलट एपिसोड होता तर, तुम्हाला अर्धी फी मिळेल. मी त्यांच्याकडे आणखी थोडे पैसे मागितले होते पण त्यांनी ते मला दिले नाही. तसंच खूप काही ऐकवलं."

तेव्हा खूप रडले...

मग पुढे अभिनेत्रीने म्हटलं, "त्याक्षणी मी खूप रडले होते, कारण मला आता बाकीचे दीड हजार रुपये कुठून आणू. याचं टेन्शन आलं होतं. काही लोक मला असंही म्हणालेले की मुलं जन्माला घालण्याची इतकी घाई का होती. तेव्हा मी त्यांना स्पष्ट शब्दांत सांगितलं, तुम्हाला माझ्या घराचे बिल्स भरावे लागत नाहीत. मी तुमच्यासाठी काम केलं आहे. जर तुम्हाला पैसे द्यायचे नसतीस तर तसं सांगा. शिवाय माझ्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलण्याचा तुम्हाला कोणीही अधिकार दिलेला नाही." असा खुलासा अभिनेत्रीने केला. 

दरम्यान, अभिनेत्री उर्वशी ढोलकियाच्या वर्क फ्रंटबद्दल सांगायचं तर तिने आजवर अनेक गाजलेल्या मालिकांमध्ये काम केलं आहे. कसौटी नंतर ती 'नागिन' मध्येही निगेटिव्ह कॅरेक्टरमध्येच दिसली. त्याचबरोबर उर्वशी 'पॉवर ऑफ फाइव्ह' या वेब सीरिजमध्येही काम केलं आहे. 

Web Title: hindi television actress urvashi dholakia open up about people used to taunt for having children

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.