बॉलिवूड अभिनेत्यासोबत जोडलं गेलं नाव; ३७ व्या वर्षीही सिंगल आहे 'तारक मेहता...' मधील बबिता, काय घडलं?
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2025 16:28 IST2025-05-21T16:21:08+5:302025-05-21T16:28:10+5:30
भांडणं, मारहाणीचा आरोप अन्...; 'तारक मेहता' फेम मुनमुन दत्ताचा 'या' अभिनेत्यावर जडलेला जीव पण...

बॉलिवूड अभिनेत्यासोबत जोडलं गेलं नाव; ३७ व्या वर्षीही सिंगल आहे 'तारक मेहता...' मधील बबिता, काय घडलं?
Munmun Dutta: 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या लोकप्रिय मालिकेतून अभिनेत्री मुनमुन दत्ता (Munmun Dutta) घराघरात पोहोचली. आपल्या सहज सुंदर अभिनयाने तिने प्रेक्षकांच्या मनात हक्काचं स्थान निर्माण केलं आहे. मुनमुन दत्ता तिच्या करिअरमध्ये प्रोफेशनल लाईफपेक्षा वैयक्तिक आयुष्यामुळे अनेकदा चर्चेत राहिली आहे. दरम्यान, मुनमुन दत्ताचं नाव एका बॉलिवूड अभिनेत्यासोबत जोडलं गेलं होतं. परंतु काही कारणामुळे तिने आपल्या नात्याला पूर्णविराम दिला.
२००८ साली मुनमुन दत्ता आणि अभिनेता अरमान कोहली (Armaan Kohli) रिलेशनशिपमध्ये होते. त्यांच्यात एका बार व्हॅलेंटाईन डेला भांडण झालं. यावेळी अरमानने चक्क तिच्यावर हात उचलला होता. यावरुन मुनमुनने अरमान कोहली विरोधात पोलिसात तक्रारही केली होती. अरमान आणि मुनमुन यांच्यातील वादाबद्दल अभिनेत्री डॉली बिंद्रा हिने एका मुलाखतीमध्ये खुलासा केला होता. 'अरमानचं मुनमुनशी असलेले वर्तन कधीच सामान्य नव्हतं,' असं तिने सांगितलं होतं.
त्यादरम्यान, डॉलीने सांगितले होते की, तिने मुनमुनला रडत घराबाहेर पडताना पाहिले होते. त्याचबरोबर तिने असंही म्हटलं होतं की,"मी माझा पती कैजादसोबतचा वाद सोडवण्याचा प्रयत्न केला होता पण अरमानने मुनमुनसोबत गैरवर्तन केलं. "अरमानसोबत ब्रेकअप झाल्यानंतर मुनमुन आता सिंगल आहे.
वर्कफ्रंट
मुनमुन दत्ताच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर तिने 'हम सब बाराती' मालिकेतून इंडस्ट्रीत पदार्पण केलं. यानंतर तिने २००८ पासून ती 'तारक मेहता का उल्टा चष्मा' मध्ये काम करत आहे. या मालिकेने तिला प्रचंड स्टारडम मिळवून दिला. याशिवाय तिने 'हॉलिडे','ढिनचॅक एंटरप्राईज' आणि 'मुंबई एक्सप्रेस' या सिनेमांमध्ये देखील ती झळकली आहे.