'कुंडली भाग्य' फेम अभिनेत्री लवकरच होणार आई; लग्नाच्या ५ वर्षानंतर घरी पाळणा हलणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2024 16:54 IST2024-11-11T16:52:15+5:302024-11-11T16:54:54+5:30
'कुंडली भाग्य' फेम अभिनेत्री रुही चतुर्वेदी लवकरच आई होणार आहे.

'कुंडली भाग्य' फेम अभिनेत्री लवकरच होणार आई; लग्नाच्या ५ वर्षानंतर घरी पाळणा हलणार
Ruhi Chaturvedi: झी टीव्ही वाहिनीवरील 'कुंडली भाग्य' (kundali Bhagya) या मालिकेत शर्लिन खुरानाची व्यक्तिरेखा साकारून अभिनेत्री रुही चतुर्वेदी (Ruhi Chaturvedi) प्रसिद्धीझोतात आली. या मालिकेत ती एका खलनायिकेच्या भूमिकेत पाहायला मिळाली. सध्या हिंदी मालिकाविश्वात रुहीबद्दल चर्चा होताना दिसतेय. याचं कारणही तितकचं खास आहे. सोशल मीडियावर नुकताच अभिनेत्रीने खास व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओने अनेकांचं लक्ष वेधलं आहे.
नुकताच रुहीने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. रुही चतुर्वेदी लवकरच आई होणार असल्याची माहिती तिने सोशल मीडियाद्वारे चाहत्यांना दिली आहे. काही दिवसांपूर्वीच 'कुंडली भाग्य' मालिकेतील मुख्य भूमिकेत असलेली अभिनेत्री श्रद्धा आर्यानेही तिच्या घरी नव्या पाहुण्याचं आगमन होणार असल्याची गुडन्यूज शेअर केली होती. त्यानंतर रुहीने सोशल मीडियावर एक खास व्हिडीओ पोस्ट करून ती गरोदर असल्याचं सांगितलं आहे.
अभिनेत्री रुही चतुर्वेदी २ डिसेंबर २०२१९ मध्ये शिवेंद्र सैनीयोलसोबत लग्नबंधनात अडकली. त्यानंतर जवळपास लग्नाच्या ५ वर्षानंतर त्यांच्या घरात चिमुकल्या पाहुण्याच आगमन होणार आहे. दरम्यान, इन्स्टाग्रामवर अभिनेत्रीने हा व्हिडीओ शेअर करत कॅप्शनमध्ये लिहलंय, "आमचं सुंदर कुटुंब थोडं मोठं होत आहे". रुहीने शेअर केलेला व्हिडीओ पाहून श्रद्धा आर्या, अभिनेता शक्ती अरोरा यांसारख्या कलाकारांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.