टीव्ही इंडस्ट्रीतील अभिनेत्याने गुपचूप केला साखरपुडा; फिल्मी स्टाइलने गर्लफ्रेंडला केलं प्रपोज
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2025 10:38 IST2025-05-17T10:21:49+5:302025-05-17T10:38:56+5:30
मालिकाविश्वातील अभिनेत्याने गुपचूप केला साखरपुडा; फिल्मी स्टाईलने गर्लफ्रेंडला केलं प्रपोज

टीव्ही इंडस्ट्रीतील अभिनेत्याने गुपचूप केला साखरपुडा; फिल्मी स्टाइलने गर्लफ्रेंडला केलं प्रपोज
Tv Actor Engeggment: सध्या मराठीसह हिंदी कलाविश्वातही लगीनघाई सुरु झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. वर्षाच्या सुरुवातीलाच काही कलाकारांनी आपल्या प्रेमाची कबुली दिली तर काही कलाकार लग्नाच्या बेडीत अडकत नव्या आयुष्याला सुरुवात केली. त्यात आता हिंदी मालिकाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्याचा नुकताच साखरपुडा पार पडला आहे. हा अभिनेता म्हणजे प्रियांश जोरा आहे. काश्मिरच्या बर्फाळ प्रदेशात गुडघ्यावर बसून फिल्मी स्टाईलने गर्लफ्रेंडला प्रपोज करत आपलं नात्याची कबुली दिली आहे.
अभिनेता प्रियांश जोरा 'तू मेरा हिरो', या मालिकेतून घराघरात पोहोचला. याशिवाय बऱ्याच टीव्ही शो आणि वेब सीरिजमध्ये तो झळकला आहे. अशातच नुकतीच अभिनेत्याचा साखरपुडा पार पडला आहे. प्रियांशची होणारी पत्नी ही एक स्पोर्टस अॅंकर असून तिचं नाव रिश्मा रोचलानी आहे. अलिकडेच सोशल मीडियावर अभिनेत्याने गर्लफ्रेंड रिश्मासोबतचा रोमॅन्टिक व्हिडीओ पोस्ट करत चाहत्यांसोबत आनंदाची बातमी शेअर केली आहे. त्याच्या या फोटोंवर कमेंट करत चाहत्यांनी दोघांनाही शुभेच्छा दिल्या आहेत. दरम्यान, अगदी दोन महिन्यापूर्वीच प्रियांश जोराने गर्लफ्रेंड रिश्माला प्रपोज केला होता. त्यानंतर आता त्यांनी कुटुंबीयांच्या उपस्थितीत साखरपुडा केला आहे.
प्रियांश गोराच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर, त्याने आजवर अनेक टीव्ही मालिकेत काम केलं आहे. 'तू मेरा हिरो', 'बडे भैया कि दुल्हनिया' या मालिकांमधून तो चांगलाच प्रसिद्धीझोतात आला.