सिद्धार्थ शुक्लाचा आत्मा बोलला...; पॅरानॉर्मल तज्ज्ञ स्टिव्ह हफचा दावा, शेअर केला व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2021 12:59 PM2021-09-13T12:59:16+5:302021-09-13T14:14:55+5:30

Watch : सिद्धार्थच्या मृत्यूनंतर स्टिव्हने  ‘सोल स्पीकिंग’ सेशन केले. याचा व्हिडीओ त्याने त्याच्या ‘हफ पॅरानॉर्मल’ या यूट्यूब चॅनेलवर अपलोड केला आहे.

Here's what Sidharth Shukla's spirit tells paranormal expert Steve Huff about his death | सिद्धार्थ शुक्लाचा आत्मा बोलला...; पॅरानॉर्मल तज्ज्ञ स्टिव्ह हफचा दावा, शेअर केला व्हिडीओ

सिद्धार्थ शुक्लाचा आत्मा बोलला...; पॅरानॉर्मल तज्ज्ञ स्टिव्ह हफचा दावा, शेअर केला व्हिडीओ

googlenewsNext
ठळक मुद्देसुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूनंतर स्टिव्ह हफने त्याच्या आत्म्याशी बोलल्याचा दावा केला होता. त्याने तीन व्हिडीओ शेअर केले होते.  

सुशांत सिंग राजपूतच्या आत्म्याशी बोलल्याचा दावा करणारा पॅरानॉर्मल तज्ज्ञ स्टिव्ह हफने (Steve Huff ) आता अभिनेता सिद्धार्थ शुक्लाच्या ( Sidharth Shukla)आत्म्याशी बोलल्याचा दावा केला आहे. चाहत्यांचा लाडका सिद्धार्थ शुक्लाचं गेल्या 2 सप्टेंबर रोजी निधन झालं. त्याच्या अकाली निधनाच्या धक्क्यातून अद्यापही चाहते सावरलेले नाहीत.  सिद्धार्थ या जगात नाही, यावर  लोकांचा विश्वास बसेना झालाय. अशात स्टिव्ह हफचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय.
या व्हिडीओत त्याने सिद्धार्थच्या आत्म्याशी बोलल्याचा दावा केला आहे. सिद्धार्थच्या मृत्यूनंतर स्टिव्हने  ‘सोल स्पीकिंग’ सेशन केले. याचा व्हिडीओ त्याने त्याच्या ‘हफ पॅरानॉर्मल’ या यूट्यूब चॅनेल वर अपलोड केला आहे.
  अनेक तास प्रयत्न केल्यानंतर सिद्धार्थ शुक्लाच्या आत्म्याशी संवाद झाला, असा दावाही स्टिव्हने केला आहे.

संबधित व्हिडीओमध्ये,स्टिव्ह  हफ त्याच्या डिव्हाईसद्वारे सिद्धार्थशी बोलण्याचा प्रयत्न करताना दिसतोय.. ‘तू आता कुठे आहेस?’, असा प्रश्न स्टिव्ह  सिद्धार्थच्या कथित आत्म्याला करतो. यावर ‘मी आलो आहे हफ.. मला माझा कुत्रा हवा आहे,’ असं उत्तर त्याला मिळतं.
‘ तुला तुझ्या आईला काही संदेश द्यायचा आहे का?’, असा प्रश्न स्टिव्ह  करतो. यावर, ‘मी मृत आहे,’ असं उत्तर त्याला मिळतं. चाहत्यांना काही सांगू इच्छितो का?, असा प्रश्न केल्यावर, ‘मी तुमचे अश्रू नक्की पुसेन,’ असं उत्तर स्टिव्हला मिळतं.
 
याआधी केला होता सुशांतच्या आत्म्याशी बोलल्याचा दावा

सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूनंतर स्टिव्ह हफने त्याच्या आत्म्याशी बोलल्याचा दावा केला होता. त्याने तीन व्हिडीओ शेअर केले होते.  व्हिडिओमध्ये स्टिव्ह  सुशांतच्या आत्म्याला विचारतो की तुला आठवतं का तुझा मृत्यू कसा झाला? स्टिव्हने हा प्रश्न विचारतात समोरील यंत्रा मधून इंग्रजी भाषेत आवाज येतो की, ‘इथे खूप प्रकाश आहे हफ, त्यांना सांग की मला आता प्रकाश मिळाला आहे. आता हा प्रकाश खूप मंद होत चालला आहे. ते तुला बघत आहेत. मला खरंच देवाला भेटायचं होतं,’
सुशांतच्या आत्म्याशी बोलल्याचा दावा केल्यानंतर स्टिव्ह हफ याच्या सोशल मीडिया फॉलोअर्समध्ये अचानक लक्षणीय वाढ झाली होती. गेल्या 10 वर्षांपासून आत्मांशी बोलत असल्याचा  स्टिव्हचा दावा आहे. यासाठी त्याने एक खास मशीन तयार केली आहे. या यंत्रामधून कथितरित्या आत्म्यांचा आवाज ऐकू येतो. स्टीव्ह याआधी मायकल जॅक्सन, पैट्रीक स्वेज यांच्या आत्म्याशी बोलल्याचा दावा केला होता.

 

Web Title: Here's what Sidharth Shukla's spirit tells paranormal expert Steve Huff about his death

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.