"आपण कायम एकमेकांना भिडत आलोय.."; हेमांगी कवीने कुशल बद्रिकेसाठी लिहिलेली पोस्ट व्हायरल

By देवेंद्र जाधव | Updated: July 21, 2025 10:05 IST2025-07-21T10:04:29+5:302025-07-21T10:05:19+5:30

आज कुशल बद्रिकेचा वाढदिवस आहे त्यानिमित्त अभिनेत्री हेमांगी कवीने खास दोस्तासाठी लिहिलेली पोस्ट चर्चेत आहे. काय म्हणाली हेमांगी?

Hemangi kavi post on Kushal Badrike birthday goes viral chala hawa yeu dya | "आपण कायम एकमेकांना भिडत आलोय.."; हेमांगी कवीने कुशल बद्रिकेसाठी लिहिलेली पोस्ट व्हायरल

"आपण कायम एकमेकांना भिडत आलोय.."; हेमांगी कवीने कुशल बद्रिकेसाठी लिहिलेली पोस्ट व्हायरल

मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेता कुशल बद्रिकेचा आज वाढदिवस. कुशलने विविध भूमिकांमधून प्रेक्षकांचं मन जिंकलंय. कुशलने चला हवा येऊ द्याच्या माध्यमातून स्वतःमधील विनोदी अभिनेत्याला सिद्ध केलं. याशिवाय युट्यूबवर स्ट्रगलर साला या वेबसीरिजच्या माध्यमातून कुशलने सर्वांना खळखळून हसवलं. कुशलच्या वाढदिवसानिमित्त त्याची खास मैत्रीण आणि सहकलाकार हेमांगी कवीने केलेली पोस्ट चर्चेत आहे. काय म्हणाली हेमांगी?

हेमांगीची कुशलच्या वाढदिवसानिमित्त खास पोस्ट

हेमांगीची कुशलसोबतचा खास फोटो पोस्ट करुन लिहिते की, "२००५ पासून ते २०२४ पर्यंत, एकांकीका स्पर्धा ते हिंदीतला comedy show पर्यंत, दर काही वर्षांच्या interval नंतर आपण कायम एकमेकांना भिडत आलोय! इतक्या वर्षात मैत्री नाही दोस्ती बहरली आपली (मैत्री आणि दोस्तीतला फरक आपणच जाणो फक्त ) प्रत्येक project च्या समाप्तीला वाटतं आता परत कधी काम करायला मिळेल या mad माणसासोबत आणि नियती काही न काही घेऊन येतेच आपल्यासाठी! या नियतीची अशीच कृपादृष्टी राहो आपल्यावर!"




"बाकी तू कलाकार, दोस्त, माणूस म्हणून किती solid आहेस हे आपल्यातली २० वर्ष साक्ष देतच आहे आणि पुढेही देत राहील so जास्त काही कौतुकास्पद लिहीत नाही!
एवढंच म्हणेन आज ३२ वं लागलं तुला (३२ च नं?), तेव्हा जरा जपून!!!", हेमांगीने जी पोस्ट लिहिली त्यानंतर अनेकांनी या पोस्टला पसंती दिली असून कुशलला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा दिल्या आहेत. कुशलच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर तो 'चला हवा येऊ द्या'च्या नवीन सीझनमधून पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

Web Title: Hemangi kavi post on Kushal Badrike birthday goes viral chala hawa yeu dya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.