३९ व्या वर्षी प्रसिद्ध अभिनेत्रीने बॉयफ्रेंडसोबत केलं लग्न, 'या' प्राचीन योग पद्धतीनुसार केला विवाह

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2025 13:09 IST2025-08-21T13:08:18+5:302025-08-21T13:09:00+5:30

लोकप्रिय अभिनेत्रीने ३९ व्या वर्षी बॉयफ्रेंडसोबत केलं लग्न. प्राचीन योग पद्धतीच्या आधाराने केला विवाह. जाणून घ्या सविस्तर

gopi bahu actress gia manek wedding with boyfriend varun jain at 39 ties the knot according to ancient yoga method | ३९ व्या वर्षी प्रसिद्ध अभिनेत्रीने बॉयफ्रेंडसोबत केलं लग्न, 'या' प्राचीन योग पद्धतीनुसार केला विवाह

३९ व्या वर्षी प्रसिद्ध अभिनेत्रीने बॉयफ्रेंडसोबत केलं लग्न, 'या' प्राचीन योग पद्धतीनुसार केला विवाह

मनोरंजन विश्वातून एक आनंदाची बातमी समोर आली आहे. वयाच्या ३९ व्या वर्षी एका प्रसिद्ध अभिनेत्रीने बॉयफ्रेंडसोबत लग्न केलं आहे. ही अभिनेत्री आहे जिया मनेक. 'साथ निभाना साथिया' मालिकेतील 'गोपी बहू'च्या भूमिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री जिया मनेक विवाहबंधनात अडकली आहे. तिने तिचा बॉयफ्रेंड वरुण जैन सोबत गुपचूप लग्न केलं आहे. या लग्नाची माहिती जियाने स्वतः सोशल मीडियावर फोटो शेअर करून दिली आहे.

जियाच्या लग्नाची चर्चा

जिया मानेकने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर लग्नाचे फोटो शेअर करत आपल्या चाहत्यांना सुखद धक्का दिला. तिने वरुण जैनसोबत लग्नगाठ बांधली असल्याची माहिती दिली. जियाने लिहिले की, "आम्ही आयुष्यभरासाठी एकत्र आलो आहोत आणि आता आम्ही मिस्टर अँड मिसेस झालो आहोत." या दोघांनी 'भूत शुद्धी विवाह' या प्राचीन योग पद्धतीनुसार लग्न केले. या पद्धतीत शरीरातील पाच तत्त्वांना शुद्ध केले जाते. लग्नात जियाने गोल्डन रंगाची साडी, त्यावर पारंपरिक दागिने आणि लाल बांगड्या परिधान केल्या होत्या.




जिया लग्नाच्या या पारंपरिक लूकमध्ये खूप सुंदर दिसत होती. जिया आणि वरुणच्या लग्नाची बातमी ऐकून त्यांच्या चाहत्यांनी सोशल मीडियावर अभिनंदनाचा वर्षाव केला आहे. जियाने 'साथ निभाना साथिया', 'तेरा मेरा साथ' अशा मालिकांमध्ये काम केलंय. 'साथ निभाना साथिया' मालिकेतील गोपी बहूच्या भूमिकेमुळे जियाला खूप लोकप्रियता मिळाली. जियाने कायमच आपलं वैयक्तिक आयुष्य खाजगी ठेवणं पसंत केलं. त्यामुळे लग्नाचा कोणताही गाजावाजा न करता जियाने थेट फोटो शेअर करुन ही गुड न्यूज सर्वांसोबत शेअर केली.

Web Title: gopi bahu actress gia manek wedding with boyfriend varun jain at 39 ties the knot according to ancient yoga method

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.