Video: "गच्चीवर उभं राहून पाहिला चंद्राचा साज...", ओंकारचा उखाणा ऐकून लाजली गौतमी पाटील, कमेंट करत म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2026 17:37 IST2026-02-20T17:37:24+5:302026-02-20T17:37:50+5:30

गौतमीचा उखाणा घेतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यानंतर आता ओंकारने गौतमीसाठी घेतलेल्या उखाण्याच्या व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

gautami patill shy after heard maharashtrachi hasyajatra fame onkar raut ukhana | Video: "गच्चीवर उभं राहून पाहिला चंद्राचा साज...", ओंकारचा उखाणा ऐकून लाजली गौतमी पाटील, कमेंट करत म्हणाली...

Video: "गच्चीवर उभं राहून पाहिला चंद्राचा साज...", ओंकारचा उखाणा ऐकून लाजली गौतमी पाटील, कमेंट करत म्हणाली...

गेल्या काही दिवसांत गौतमी पाटील आणि महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेता ओंकार राऊतचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यामध्ये गौतमी आणि ओंकार नुकतंच लग्न झालेल्या जोडप्याच्या लूकमध्ये दिसत आहेत. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर गौतमीने खरंच लग्न केलं की काय असा प्रश्न चाहत्यांना पडला होता. मात्र त्यांनी लग्न केलं नसून एका अल्बम साँगसाठी त्यांनी हा लूक केला होता. 

या गाण्यातील गौतमीचा उखाणा घेतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. "ना वायफाय ना इंटरनेट...गच्चीवर झाली आमची पहिली भेट...ओंकार रावांचं नाव घेते आमची जोडी एकदम परफेक्ट", असा उखाणा गौतमीने घेतला होता. त्यानंतर आता ओंकारने गौतमीसाठी घेतलेल्या उखाण्याच्या व्हिडीओ व्हायरल झाला आहे. "गच्चीवर उभं राहून पाहिला चंद्राचा साज...गच्चीवर उभं राहून पाहिला चंद्राचा साज...माझ्या गौतमीसोबत आयुष्य होईल खास", असा उखाणा ओंकारने गौतमीसाठी घेतला आहे. 


ओंकारने उखाणा घेतल्यानंतर गौतमी लाजल्याचं पाहायला मिळत आहे. ओंकारच्या या व्हिडीओवर चाहत्यांनी कमेंट केल्या आहेत. तर गौतमी पाटीलनेही कमेंट करत इमोजी पोस्ट केले आहेत. गौतमी आणि ओंकारची 'गच्ची' या गाण्यातील केमिस्ट्रीही चाहत्यांना आवडली आहे. या गाण्याला काही दिवसांतच लाखो व्ह्यूज मिळाले आहेत. 

Web Title : ओंकार के उखाणे पर गौतमी पाटिल शरमाईं; प्रशंसकों को पसंद आई केमिस्ट्री।

Web Summary : गौतमी पाटिल और ओंकार राउत का वीडियो वायरल, शादी की अफवाहें उड़ीं, लेकिन यह एक गाने के लिए था। ओंकार के 'उखाणे' से गौतमी शरमा गईं। गाने 'गच्ची' में उनकी केमिस्ट्री को फैंस ने खूब पसंद किया, लाखों व्यूज मिले।

Web Title : Gautami Patil blushes at Onkar's 'ukhana'; fans love their chemistry.

Web Summary : Gautami Patil and Onkar Raut's video went viral, sparking wedding rumors, but it was for a song. Onkar's 'ukhana' for Gautami made her blush. Their chemistry in the song 'Gacchi' is loved by fans, garnering millions of views.