गौतमी पाटील Bigg Boss Marathi मध्ये वाईल्ड कार्ड एन्ट्री घेणार? म्हणाली, "त्याबद्दल..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2024 12:00 IST2024-09-04T11:59:39+5:302024-09-04T12:00:49+5:30
बिग बॉस सुरु होऊन आता एक महिना उलटून गेला आहे. दरम्यान कोणता स्पर्धक घरात वाईल्ड कार्ड एन्ट्री घेणार याची चर्चा रंगली आहे.

गौतमी पाटील Bigg Boss Marathi मध्ये वाईल्ड कार्ड एन्ट्री घेणार? म्हणाली, "त्याबद्दल..."
सध्या टेलिव्हिजनवर बिग बॉस मराठीचीच चर्चा आहे. भांडणं, टास्क, कॅप्टन्सी, बीबी करन्सी यामुळे सगळेच स्पर्धक घर दणाणून सोडत आहेत. बिग बॉस सुरु होऊन आता एक महिना उलटून गेला आहे. दरम्यान कोणता स्पर्धक घरात वाईल्ड कार्ड एन्ट्री घेणार याची चर्चा रंगली आहे. गौतमी पाटीलच्याही (Gautami Patil) नावाची चर्चा झाली. नुकतंच गौतमीने यावर या चर्चांवर उत्तर दिलं आहे.
गौतमी पाटीलचे सध्या महाराष्ट्रभर कार्यक्रम सुरु आहेत. दहीहंडीच्या कार्यक्रमांसाठीही तिला विविध ठिकाणी बोलवण्यात आलं होतं. यावेळी स्टार मराठी मीडियाला दिलेल्या मुलाखतीत गौतमीला बिग बॉसमध्ये जाणार का? असा प्रश्न विचारण्यात आला. यावर गौतमी म्हणाली, 'नो कमेंट्स.' तू बिग बॉस फॉलो करतेस का? कोणाला सपोर्ट करतेस? यावर ती म्हणाली, "मी घरी जास्त नसतेच. माझे दौरेच सुरु असतात. त्यामुळे मला सिनेमा, वेब सीरिज, शो हे सगळं आवडत असलं तरी मला याविषयी काहीच अपडेट नाही." तिला सुरज चव्हाणला मिळणाऱ्या प्रचंड सपोर्टविषयी सांगण्यात आलं. तेव्हा ती म्हणाली, "सूरज ऑल द बेस्ट. तूच ट्रॉफी जिंकून ये."
गौतमी पाटीलची क्रेझ पाहता तिला बिग बॉसची ऑफर आलीच असणार असाच सर्वांना अंदाज होता. मात्र यावर तिने आता पूर्णविराम लावला आहे. त्यामुळे बिग बॉसमध्ये कोण वाईल्ड कार्ड एन्ट्री घेणार हा अजूनही प्रश्नच आहे. आगामी एका सिनेमात गौतमीचं आयटम साँग असणार आहे.