Love story: पहिल्या भेटीत गौतमीने दिला होता स्वानंदला नकार; 'या' कारणामुळे शेवटी दिला होकार
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2023 09:38 IST2023-12-28T09:38:23+5:302023-12-28T09:38:56+5:30
Gautami deshpande: लग्नातील एका व्हिडीओमध्ये गौतमीने तिची लव्हस्टोरी सांगितली आहे.

Love story: पहिल्या भेटीत गौतमीने दिला होता स्वानंदला नकार; 'या' कारणामुळे शेवटी दिला होकार
'माझा होशील ना' या मालिकेच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे गौतमी देशपांडे (gautami deshpande). २५ डिसेंबर रोजी गौतमीने स्वानंद तेंडूलकर (swanand tendulkar) याच्यासोबत मोठ्या थाटामाटात लग्नगाठ बांधली. त्यामुळे सध्या ही जोडी चर्चेत आहे. गौतमीच्या लग्नातील मेहंदी सोहळ्यापासून ते रिसेप्शन पार्टीपर्यंत प्रत्येक गोष्टीची चर्चा झाली. परंतु, स्वानंद आणि तिची ओळख कशी झाली, त्यांचं लव्हमॅरेज आहे की अरेंज मॅरेज असे कितीतरी प्रश्न चाहत्यांना पडले होते. यामध्येच गौतमीने तिच्या लग्नातील एक व्हिडीओ शेअर करत तिची भन्नाट लव्हस्टोरी सांगितली.
गौतमी आणि स्वानंद यांचं लव्ह मॅरेज आहे. विशेष म्हणजे पहिल्याच भेटीत गौतमीने स्वानंदला नकार दिला होता. परंतु, त्याच्यासोबत मैत्री झाल्यानंतर ती सुद्धा त्याच्या प्रेमात पडली. त्यांच्या या प्रेमाचा प्रवास तिने लग्नातील एका व्हिडीओमध्ये सांगितला आहे. तसंच पहिलं प्रपोज कोणी केलं हे सुद्धा तिने सांगितलं.
खूप प्रामाणिकपणे सांगतो. मुळातच पाहताक्षणी ती मला आवडली होती. हे तिला मी कधी सांगतलं नव्हतं पण आता ही गोष्ट सांगतोय. तिला पाहिल्यावरच मी विचारलं होतं की, मी डेट करु शकतो का? तर ती नाही म्हणाली, असं स्वानंदने सांगितलं. त्यावर, थोडीशी मैत्री वाढली, बोलणं वाढलं. त्याच्यानंतर तो मला जास्त आवडायला लागला. आणि, नंतर मग कळलं की, हे सगळं मस्त चाललंय, छान आहे हे सगळं. खूप गोड आहे, असं गौतमी म्हणाली.
दरम्यान, गौतमी आणि स्वानंद यांची जोडी सध्या लोकप्रिय ठरत आहे. गौतमी मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. 'माझा होशील ना' या मालिकेनंतर सध्या ती 'गालिब' या नाटकात काम करत आहे. तर, स्वानंद हा भाडिपाचा बिझनेस हेड आहे.