'बिग बॉस १९'ची ट्रॉफी जिंकणाऱ्या गौरव खन्नाला मोठा धक्का! थेट युट्यूबने केली कारवाई, नेमकं काय घडलं?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2025 12:42 IST2025-12-17T12:35:17+5:302025-12-17T12:42:45+5:30
'बिग बॉस १९'चं विजेतेपद जिंकणाऱ्या गौरव खन्नाला मोठं नुकसान सहन करावं लागलं आहे. काय घडलं नेमकं?

'बिग बॉस १९'ची ट्रॉफी जिंकणाऱ्या गौरव खन्नाला मोठा धक्का! थेट युट्यूबने केली कारवाई, नेमकं काय घडलं?
लोकप्रिय रिअॅलिटी शो 'बिग बॉस १९'चा विजेता ठरलेला अभिनेता गौरव खन्नाला (Gaurav Khanna) एक मोठं नुकसान झालं आहे. गौरवला युट्यूबच्या माध्यमातून एक मोठा फटका बसला आहे. त्यामुळे गौरव खन्ना आणि त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. काय घडलं नेमकं? जाणून घ्या.
बिग बॉसची ट्रॉफी जिंकल्यानंतर गौरवने नुकतेच आपले यूट्यूब चॅनेल सुरू केले होते. मात्र चॅनेल सुरू होऊन २४ तास पूर्ण होण्याआधीच युट्यूबने त्याचा पहिला व्हिडिओ टर्मिनेट केला आहे. विजेतेपदानंतर मिळालेल्या प्रसिद्धीचा फायदा घेत गौरव खन्नाने आपला युट्यूब प्रवास सुरू केला. त्याने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर करून चाहत्यांना हे चॅनल सुरु करत असल्याची माहिती दिली होती. या चॅनलचे श्रेय त्याने मृदुल तिवारी आणि प्रणित मोरे या दोघांना दिले होते.
या व्हिडिओमध्ये गौरवने 'बिग बॉस १९' मधील आपल्या प्रवासावर मोकळेपणाने चर्चा केली होती. 'बिग बॉस'ला अनेक लोक फक्त भांडणांचा शो मानतात, पण आपण शोमध्ये तसे काही केले नाही, असे त्याने स्पष्ट केले होते. तसेच, शोमध्ये 'गौरवने काहीच केले नाही' असे म्हणणाऱ्या टीकाकारांनाही त्याने आपल्या खास शैलीत उत्तर दिले होते.
मात्र गौरवने व्हिडिओ अपलोड केल्यानंतर काही तासांतच युट्यूबने तो टर्मिनेट केला. विशेष म्हणजे, अनेक युजर्स असा दावा करत आहेत की युट्यूबने केवळ व्हिडिओच नाही, तर गौरव खन्नाचे संपूर्ण चॅनलच बाद करुन टाकण्याची शक्यता आहे. युट्यूबच्या 'मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन' केल्यामुळे गौरवच्या चॅनलवर ही कारवाई करण्यात आली असावी, असे युजर्सचे म्हणणे आहे. यामागचे नेमके कारण काय आहे, याबद्दल गौरव खन्नाकडून अद्याप कोणतीही अधिकृत माहिती आलेली नाही.
७ डिसेंबर रोजी 'बिग बॉस १९' चा ग्रँड फिनाले पार पडला, ज्यात गौरव खन्नाला सर्वाधिक मते मिळाली आणि त्याने ही ट्रॉफी आपल्या नावावर केली. फरहाना भट्ट फर्स्ट रनर अप तर प्रणित मोरे सेकंड रनरअप ठरला होता.