गौहर खानच्या सासऱ्यांचा मोठा खुलासा, सुनेच्या इंटिमेट सीनबद्दल म्हणाले- "आमचे विचार हे..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2025 12:30 IST2025-10-09T12:26:36+5:302025-10-09T12:30:16+5:30
गौहर खानचे सासरे इस्माइल दरबार हे बॉलिवूडमधील प्रसिद्ध संगीतकार आहेत. त्यांनी सुनेबद्दल केलेलं वक्तव्य चर्चेत आहे

गौहर खानच्या सासऱ्यांचा मोठा खुलासा, सुनेच्या इंटिमेट सीनबद्दल म्हणाले- "आमचे विचार हे..."
प्रसिद्ध संगीतकार इस्माइल दरबार यांनी एक विधान केल्यामुळे सर्वांचं लक्ष वेधलं आहे. अभिनेत्री गौहर खान ही इस्माइल दरबार यांची सून आहे. एका मुलाखतीत बोलताना इस्माइल दरबार यांनी स्पष्ट केले की, गौहर खान एक चांगली आई असून त्यांचा मुलगा आणि सुनेचं नातं खूप चांगलं आहे. पण मी स्वतः जुन्या आणि मागास विचारसरणीचा असल्यामुळे गौहरचे काम पाहणं मी टाळतो, अशी कबुलीही त्यांनी दिली. काय म्हणाले इस्माइल दरबार?
विकी ललवानीला दिलेल्या मुलाखतीत इस्माइल दरबार म्हणाले की, "मी एका मागासलेल्या कुटुंबातून येतो. चित्रपटात जेव्हा एखादं आक्षेपार्ह दृश्य दिसायचं, तेव्हा आम्ही लगेच तोंड फिरवायचो. आजही आमच्या घरात असंच वातावरण आहे. गौहर आता आमच्या कुटुंबाचा भाग आहे आणि तिच्या प्रतिष्ठेची जबाबदारी आमची आहे." यावेळी त्यांनी आपली दुसरी पत्नी आयेशा हिचं उदाहरण दिलं. आयेशाने बाळासाठी ५ लाख रुपये मासिक उत्पन्न असलेले करिअर सोडलं आणि कुटुंबाला प्राधान्य दिले.
गौहरचं काम थांबवण्याचा हक्क फक्त...
गौहरच्या कामाबद्दल थेट हस्तक्षेप का करत नाही, यावर दरबार यांनी स्पष्ट भूमिका मांडली. "मी तिला काम करू नकोस असं सांगू शकत नाही. तो अधिकार फक्त माझा मुलगा झाईदला आहे. त्यामुळे मला त्रास होईल अशा गोष्टींपासून मी दूर राहतो. मी माझ्या मनातले विचार मनात ठेवणारा माणूस नाही. मी स्पष्टपणे सांगून मोकळा होतो. त्यामुळे मी जे काही पाहतोय ते जर मला सहन झालं नाही, तर मी त्यांना जाब विचारणार. म्हणूनच मी कधीकधी गौहरचं काम टाळतो. कारण माझे विचार तसे आहेत.'' गौहर खान आणि झाईद दरबार यांनी २०२० मध्ये लग्न केलं आणि त्यांना २०२३ आणि २०२५ मध्ये दोन मुलं झाली आहेत.