हास्यजत्रा फेम शिवाली परबचा ‘तू मेरा तू मेरा हीरो नं.1’ या गाण्यावर भन्नाट डान्स, व्हिडीओ व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2023 19:23 IST2023-11-29T19:21:36+5:302023-11-29T19:23:07+5:30
छोट्या पडद्यावर सगळ्यात जास्त गाजणारा कार्यक्रम म्हणजे 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' आणि त्यातील प्रचंड गाजलेली कलाकार म्हणजे शिवाली परब. शिवालीने कायमच ...

हास्यजत्रा फेम शिवाली परबचा ‘तू मेरा तू मेरा हीरो नं.1’ या गाण्यावर भन्नाट डान्स, व्हिडीओ व्हायरल
छोट्या पडद्यावर सगळ्यात जास्त गाजणारा कार्यक्रम म्हणजे 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' आणि त्यातील प्रचंड गाजलेली कलाकार म्हणजे शिवाली परब. शिवालीने कायमच आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना आपलंसं केलं. तिच्या अभिनयाइतकेच तिच्या सौंदर्याचे देखील चाहते आहेत. सोशल मीडियावरही तिची ही लोकप्रियता स्पष्ट जाणवते. अभिनेत्रीने शेअर केलेल्या प्रत्येक फोटोवर शेकडो कमेंट्स असतात. नुकतेच शिवालीने ९० च्या दशकातल्या एका गाण्यावर व्हिडीओ शेअर केला आहे.
शिवालीने शेअर केलेल्या व्हिडीओला तिने ‘तू मेरा तू मेरा हीरो नं.१’ असं कॅप्शन दिलं आहे. फुलांची डिझाईन असलेली साडी आणि ग्लॉसी मेकअपमध्ये ती अगदी सुंदर दिसत आहे. चाहत्यांनी शिवालीच्या डान्सचे कौतुक केले आहे. एकाने म्हटले, "खूप छान डान्स', असे म्हटले. तर एका चाहत्याने तिला ‘डान्सिंग डॉल’ म्हणत कौतुक केलं.
शिवालीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाल्यास, ती 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मध्ये विविध पात्र साकारते. 'मोना डार्लिंग' असो किंवा 'शिवाली अवली कोहली', तिच्या प्रत्येक पात्राने प्रेक्षकांंचे मनोरंजन केले आहे. दरम्यान 'अवली लवली कोहली' या स्किटची भुरळ सोशल मीडियावर अनेकांना पडल्याचे दिसून आले. शिवाय, ती 'प्रेम, प्रथा धुमशान' सिनेमातही झळकली होती.