House Arrest Ullu app: एजाज खानच्या अडचणी वाढल्या! 'हाउस अरेस्ट शो' प्रकरणात पोलिसांकडून पहिली अ‍ॅक्शन

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2025 12:22 IST2025-05-03T12:21:20+5:302025-05-03T12:22:18+5:30

हाउस अरेस्ट या वादग्रस्त शोमुळे एजाज खान आणखी अडकणार असल्याची शक्यता आहे. अभिनेत्याविरोधात FIR दाखल करण्यात आला आहे

FIR registered against actor Ajaz Khan and others ongoing controversy House Arrest show on Ullu App | House Arrest Ullu app: एजाज खानच्या अडचणी वाढल्या! 'हाउस अरेस्ट शो' प्रकरणात पोलिसांकडून पहिली अ‍ॅक्शन

House Arrest Ullu app: एजाज खानच्या अडचणी वाढल्या! 'हाउस अरेस्ट शो' प्रकरणात पोलिसांकडून पहिली अ‍ॅक्शन

'हाउस अरेस्ट' शो सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे.  अभिनेता एजाज खान आणि 'हाऊस अरेस्ट' या वेब शोच्या निर्मात्यांविरोधात अश्लील सामग्री प्रसारित केल्याच्या आरोपावरून FIR दाखल करण्यात आली आहे. या शोमध्ये असलेल्या काही दृश्यांमुळे सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. विशेषतः उल्लू अ‍ॅपवर प्रसारित झालेल्या एका क्लिपमध्ये एजाज खान (ajaz khan) एका अभिनेत्रीला अश्लील दृश्य करण्यास प्रवृत्त करताना दिसत आहेत, ज्यामुळे प्रेक्षकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. याप्रकरणी आलेल्या तक्रारीवरुन मुंबई पोलिसांनी एजाज खानविरुद्ध  FIR दाखल केलाय. 

एजाज खानविरोधात FIR, नेमकं प्रकरण काय

मुंबईतील अंबोली पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांनी याविषयी खुलासा केला. त्यांनी सांगितलं की, बजरंग दलाचे कार्यकर्ते गौतम रावरिया यांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार अभिनेता एजाज खान, हाउस अरेस्ट वेब शोचे निर्माते राजकुमार पांडे आणि उल्लू अॅप संबंधित अन्य व्यक्तींविरोधात FIR दाखल करण्यात आला आहे. हाउस अरेस्ट शोमध्ये असलेली अश्लील भाषा आणि शोमधील काही दृश्यांमुळे महिलांच्या आत्मसन्मानाला धक्का पोहोचला आहे, अशा तक्रारीच्या आधारे एजाज खानविरोधात हा FIR नोंदवण्यात आला आहे.

संपूर्ण प्रकरण काय?

राष्ट्रीय महिला आयोगाने (NCW) उल्लू अॅपचे सीईओ विभू अग्रवाल आणि होस्ट एजाज खान यांना याआधी समन्स पाठवले आहेत. दोघांनाही ९ मे पर्यंत आयोगासमोर हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. समन्सनुसार, २९ एप्रिल २०२५ रोजी शोची एक छोटी क्लिप व्हायरल झाली. यामध्ये एजाज खान महिला स्पर्धकांना विचित्र प्रश्न विचारताना आणि कॅमेऱ्यासमोर अश्लील पोझ देण्यास सांगताना दिसतोय.

आयोगाचे म्हणणे आहे की, अशाप्रकारचा कंटेट केवळ महिलांच्या प्रतिष्ठेच्या विरोधात नाही तर मनोरंजनाच्या नावाखाली लैंगिक छळाला प्रोत्साहन देणारा आहे. आरोप सिद्ध झाले, तर ते भारतीय न्याय संहिता, 2023 आणि माहिती तंत्रज्ञान कायदा, 2000 अंतर्गत गंभीर गुन्ह्याच्या श्रेणीत येईल. आता मुंबई पोलिसांनी FIR दाखल केल्यावर एजाज खान आणि शोच्या मेकर्सवर पुढील कारवाई काय होणार, याकडे सर्वांचं लक्ष आहे.

Web Title: FIR registered against actor Ajaz Khan and others ongoing controversy House Arrest show on Ullu App

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.