KBC 13 : मेरा एक बच्चा ले लो...! फराह खानची ऑफर ऐकून अमिताभ यांनाही आवरलं नाही हसू

By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2021 11:30 AM2021-09-07T11:30:38+5:302021-09-07T11:31:09+5:30

Kaun Banega Crorepati 13 : ‘केबीसी 13’च्या सेटवर फराह खानने अमिताभ बच्चन यांना दिली ऑफर

Farah Khan offers Amitabh Bachchan ‘mera ek baccha lelo’ for more KBC questions | KBC 13 : मेरा एक बच्चा ले लो...! फराह खानची ऑफर ऐकून अमिताभ यांनाही आवरलं नाही हसू

KBC 13 : मेरा एक बच्चा ले लो...! फराह खानची ऑफर ऐकून अमिताभ यांनाही आवरलं नाही हसू

googlenewsNext
ठळक मुद्देफराह तीन मुलांची आई आहे. 2008 मध्ये तिने तिळ्या मुलांना जन्म दिला होता.

कौन बनेगा करोडपती 13’मध्ये  (Kaun Banega Crorepati 13 ) येत्या शुक्रवारी धम्माल मज्जा मस्ती होणार आहे. होय, या स्पेशल एपिसोडमध्ये दिग्दर्शक, कोरिओग्राफर फराह खान (Farah Khan ) आणि अभिनेत्री दीपिका पादुकोण (Deepika Padukone) हॉटसीटवर बसलेल्या दिसणार आहेत. हा एपिसोड किती धमाकेदार होणार आहे, याचा अंदाज तुम्ही याचा प्रोमो पाहून बांधू शकता. होय, या प्रोमोमध्ये फराह खान प्रश्नांच्या बदल्यात तिचं एक मुलं अमिताभ (Amitabh Bachchan) यांना ऑफर करताना दिसतेय.
‘गेम  खेलने के लिए सीमित समय दिया जाएगा. समय सीमा समाप्त होने के बाद हूटर बज जाएगा और आपको गेम खत्म करना पडेगा,’ असं बिग बी गेम सुरू होण्यापूर्वी दीपिका व फराहला सांगतात. फराह व दीपिका इतक्या उत्सुक असतात की, लवकर गेम सुरू करा, असं बिग बींगना सांगतात. गेम सुरू होतो आणि काही सेकंदातच हूटर वाजतो. हा हूटर ऐकून फराह व दीपिका अमिताभ यांच्याकडे आणखी एक प्रश्न खेळू देण्याची विनंती करतात.

गेम खेळू दिला तर मी तुमच्यासोबत एक सिनेमा करेल, आपण तर एकत्र एक सिनेमा करतोय ना, असे दीपिका म्हणते. फराह म्हणते, सर मी सुद्धा तुम्हाला कास्ट करतेय. यावर अमिताभ आणखी काय काय करू शकता, असं विचारतात. यावर फराह म्हणते, सर आता यापेक्षा आणखी काय करू शकतो? माझं एक मुलं ठेऊन घ्या....
फराहची ही ऑफर ऐकून अमिताभ यांना हसू आवरत नाही. तुम्हाला माहित आहेच की, फराह तीन मुलांची आई आहे. 2008 मध्ये तिने तिळ्या मुलांना जन्म दिला होता.

Web Title: Farah Khan offers Amitabh Bachchan ‘mera ek baccha lelo’ for more KBC questions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.