काळवंडलेला चेहरा, डोक्यावर टोपी अन् पायात स्लीपर; कॉमेडीयन सुनील पालची अवस्था बघून चाहते हैराण
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2025 14:58 IST2025-12-13T14:54:52+5:302025-12-13T14:58:03+5:30
कोणे एके काळी प्रसिद्धीच्या शिखरावर असलेल्या सुनील पालची अशी अवस्था पाहून चाहत्यांना धक्का बसला आहे.

काळवंडलेला चेहरा, डोक्यावर टोपी अन् पायात स्लीपर; कॉमेडीयन सुनील पालची अवस्था बघून चाहते हैराण
मनोरंजन विश्वातील अनेक अभिनेते प्रसिद्धीच्या शिखरावर असतात. पण काही अभिनेत्यांना मिळालेली प्रसिद्धी आणि यश सांभाळता येत नाही. त्यामुळे या अभिनेत्यांची पुढे वाईट अवस्था होते. कॉमेडियन आणि अभिनेता सुनील पालची अशीच अवस्था पाहून चाहते हैराण झाले आहेत. सुनील नुकतंच कपिल शर्माच्या एका सिनेमाच्या प्रमोशनल इव्हेंटमध्ये सहभागी झाला होता. त्यावेळी सुनीलची अवस्था पाहून चाहत्यांना धक्का बसला आहे.
काळवंडलेला चेहरा, डोक्यावर टोपी...
सुनील पाल गेल्या काही दिवसांपासून आपल्या वादग्रस्त आणि टीकात्मक वक्तव्यांमुळे कायम चर्चेत असतो. सुनील पाल कपिल शर्माच्या 'किस किस को प्यार करू २' या सिनेमाच्या प्रमोशनल इव्हेंटमध्ये सहभागी झाला होता. त्यावेळी सैल शर्ट, पायात स्लीपर, डोक्यावर टोपी आणि काळवंडलेला चेहरा अशा अवतारात सुनीलला पाहून चाहते हैराण झाले आहेत. सुनीलला सहकलाकारांनी आर्थिक मदत करावी, अशा अनेकांनी कमेंट केल्या आहेत. सुनील आणि कपिल शर्मा एकमेकांचे चांगले मित्र आहेत. त्यामुळे मित्राच्या सिनेमाला शुभेच्छा द्यायला सुनील उपस्थित होता.
सुनीलचं झालेलं अपहरण
गेल्या वर्षी अर्थात डिसेंबर २०२४ मध्ये सुनीलचं अपहरण झालं होतं. हरिद्वारजवळ सुनील एक शो करायला गेला होता. त्यावेळी एका अनोळखी गाडीतून सुनीलजवळ काही माणसं आली आणि त्यांनी त्याचं अपहरण केलं. सुनीलजवळ त्या लोकांनी २० लाख रुपयांची मागणी केली होती. परंतु सुनीलने कसेबसे १० लाख रुपये देऊन गुंडांच्या तावडीतून स्वतःची सुटका करुन घेतली. सुनील सध्या कोणत्याही माध्यमात काम करताना दिसत नाही.