पुन्हा एकदा फॅमिली ड्रामा! 'कहानी घर घर की' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला?
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2022 19:36 IST2022-07-26T19:35:57+5:302022-07-26T19:36:40+5:30
Kahaani ghar ghar ki: तब्बल १४ वर्षांनंतर ही मालिका पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचं म्हटलं जात आहे.

Photo: social media
एकता कपूरची (Ekta Kapoor) मोस्ट पॉप्युलर ठरलेली मालिका म्हणजे 'कहानी घर घर की' (Kahaani Ghar Ghar Kii). एकेकाळी या मालिकेने संपूर्ण महिला वर्गाचं लक्ष वेधून घेतलं होतं. उत्तम कथानक आणि त्याला साजेसा कलाकरांचा अभिनय यामुळे ही मालिका लोकप्रिय झाली होती. विशेष म्हणजे तब्बल १४ वर्षांनंतर ही मालिका पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचं म्हटलं जात आहे.
२००० साली सुरु झालेल्या या मालिकेने २००८ मध्ये प्रेक्षकांचा निरोप घेतला होता. टीआरपीमध्ये त्याकाळी अव्वल असलेली ही मालिका आता पुन्हा नव्या अंदाजात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे आता या मालिकेविषयी प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, या मालिकेची कथा लिहून झाली असून सध्या नव्या स्टारकास्टची निवड प्रक्रिया सुरु आहे. ही स्टारकास्ट फायनल झाल्यानंतर मालिकेच्या चित्रीकरणाला सुरुवात करण्यात येईल. सध्या तरी एकता कपूर किंवा तिच्या टीमकडून या नव्या सीजनविषयी कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.
दरम्यान, या मालिकेमध्ये अभिनेत्री साक्षी तंवरने पार्वती ही भूमिका साकारुन विशेष लोकप्रियता मिळवली होती. त्यामुळे या नव्या मालिकेत पार्वतीच्या भूमिकेत पुन्हा साक्षी दिसणार की अन्य नवीन अभिनेत्री हे मात्र गुलदस्त्यात आहे.