वडिलांनी मारली मिठी अन् आईला लेकाचा अभिमान! संपूर्ण कुटुंबाला बघून धनंजयच्या अश्रूंचा फुटला बांध
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2024 15:25 IST2024-09-26T15:24:24+5:302024-09-26T15:25:38+5:30
आज बिग बॉसच्या घरात फॅमिली वीकमध्ये DP अर्थात धनंजय पोवारचं कुटुंब येणार आहे (dhananjay powar, bigg boss marathi 5)

वडिलांनी मारली मिठी अन् आईला लेकाचा अभिमान! संपूर्ण कुटुंबाला बघून धनंजयच्या अश्रूंचा फुटला बांध
आज बिग बॉस मराठीच्या घरात फॅमिली वीक सुरु होणार आहे. यामध्ये प्रत्येक सदस्याच्या घरचे बिग बॉसच्या घरात येणार आहेत. इतक्या दिवसांनी कुटुंबातील लोकांना प्रत्यक्ष भेटल्यावर सदस्यांना अश्रू अनावर होणार आहेत. बिग बॉस मराठीने नवीन प्रोमो रिलीज केलाय. या प्रोमोत DP अर्थात धनंजय पोवारचे वडील, आई आणि पत्नी घरात येणार आहेत. वडिलांना मिठी मारताना DP च्या अश्रूंचा बांध फुटला.
DP ची फॅमिली बिग बॉसच्या घरात
बिग बॉस मराठीने एक नवीन प्रोमो रिलीज केलाय. या प्रोमोत 'एका सदस्याचं स्वप्न होतं की वडिलांनी आपलं कौतुक करावं आणि आज तो दिवस आला आहे', अशी बिग बॉस घोषणा करतात. ही घोषणा ऐकताच धनंजयचे डोळे पाण्याने डबडबतात. पुढे दार उघडलं जातं आणि DP चे बाबा घरात येतात. बाबा DP ला घट्ट मिठी मारतात. दोघांच्या डोळ्यांतून अश्रू वाहतात. पुढे DP ची पत्नी आणि आईचीही एन्ट्री होते.
DP वडिलांना सोफ्यावर बसवतो अन्...
पुढे या प्रोमोत दिसतं की, DP वडिलांना सोफ्यावर बसवतो. DP वडिलांचे पाय दाबतो. नंतर DP च्या पत्नीची एन्ट्री होते. DP ची आईही सोबत असते. DP ची आई अन् पत्नी हात जोडून सर्वांना नमस्कार करत घरात प्रवेश करतात. दोघींच्या डोळ्यात पाणी असतं. पत्नी आल्या आल्याच DP ला वाकून नमस्कार करते. पुढे आई अन् पत्नी दोघेही DP ला मिठी मारतात. "मला अभिमान वाटतोय तुझा", असं आई DP ला म्हणते. अशाप्रकारे DP दादाच्या अश्रूंचा बांध फुटतो.