फोटोत क्युट स्माईल देणाऱ्या या मुलीला ओळखलंत का?, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील आहे ती प्रसिद्ध चेहरा
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2023 19:33 IST2023-04-03T19:30:01+5:302023-04-03T19:33:45+5:30
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' शोमधील एका लोकप्रिय अभिनेत्रीने तिचा हा लहानपणीचा फोटो पोस्ट केलाय. तुम्ही ओळखलंत का तिला.

फोटोत क्युट स्माईल देणाऱ्या या मुलीला ओळखलंत का?, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील आहे ती प्रसिद्ध चेहरा
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' (Maharashtrachi Hasyajatra) हा लोकप्रिय विनोदी शो घराघरात पोहोचला आहे. या शोचा आणि त्यातील कलाकारांचा कोम चाहता नसेल. प्रेक्षकांना खळखळून हसवणारे हास्यजत्रेतील सर्वाच कलाकार स्टार झालेत. विनोदांचं अचूक टायमिंग साधत त्यांनी प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडली आहे. शोमधील एका लोकप्रिय अभिनेत्रीने तिचा हा लहानपणीचा फोटो पोस्ट केलाय. बघा ओळखता येतोय का?
काही दिवसांपूर्वीच सोनी टीव्हीवर सुरु झालेली 'पोस्ट ऑफिस उघडं आहे' मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतलाय.२ एप्रिलला पोस्ट ऑफिस उघडं आहे मालिकेचा शेवटचा भाग प्रसारित झाला. या मालिकेच्या निमित्ताने कलाकारांनी ९०च्या दशकातील फोटो पोस्ट करत आठवणींना उजाळा दिला. या मालिकेत हास्यजत्रेतील काही कलाकारांनी भूमिका साकारल्या. सर्वच कलाकारांनी आपला बालपणीचा फोटो पोस्ट केला आहे. ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ शोमधून घराघरात पोहोचलेली ईशा डे आहे.
ईशाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन १९९७ सालातील काही फोटो शेअर केले होते. या फोटोला तिने “‘पोस्ट ऑफीस उघडं आहे’ या मालिकेने आम्हांला आणि तुम्हांलाही ९० च्या काळात नेलं. तर हा आहे माझा १९९७ मधील फोटो…तुम्हीही तुमचा १९९७ मधील फोटो पोस्ट करा सोनी मराठी वहिनीला टॅग करा आणि #PostOfficeUghadAahe हा हॅशटॅग वापरा, ” असं कॅप्शन दिलं आहे.
ईशाने लंडनमधून अभिनयाचे शिक्षण घेतले आहे. तिनं ‘सुखी माणसाचा सदरा’ व ‘चूक भूल द्यावी घ्यावी’ या मालिकांमध्ये देखील काम केलं आहे. बॉबी देओलच्या ‘आश्रम 3’ या वेब सीरिजमध्येही ईशा झळकली होती.