"मी १०० वेळा त्यांना सांगितलंय..."; पत्रकार परिषदेत दिव्या शिंदेचा 'तलवारी'बद्दल खुलासा, म्हणाली- "या संविधानिक देशात..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2026 17:52 IST2026-02-11T17:49:01+5:302026-02-11T17:52:36+5:30

सर्व मुद्द्यांना धरुन दिव्या शिंदेने आज पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत दिव्याने जे काही शब्द उच्चारले, आणि जी भाषा वापरली त्यावर स्पष्टीकरण दिलं. काय म्हणाली दिव्या?

Divya Shinde revelation about bigg boss marathi incident in the press conference mumbai | "मी १०० वेळा त्यांना सांगितलंय..."; पत्रकार परिषदेत दिव्या शिंदेचा 'तलवारी'बद्दल खुलासा, म्हणाली- "या संविधानिक देशात..."

"मी १०० वेळा त्यांना सांगितलंय..."; पत्रकार परिषदेत दिव्या शिंदेचा 'तलवारी'बद्दल खुलासा, म्हणाली- "या संविधानिक देशात..."

'बिग बॉस मराठी ६' मधून दिव्या शिंदे घराबाहेर पडली. नॅशनल टेलिव्हिजनवर तलवार चालवण्याची भाषा करणं आणि सदस्यांना जीवे मारण्याची धमकी देणं, यामुळे दिव्या शिंदेला बिग बॉसने घराबाहेर काढलं. अशातच या सर्व मुद्द्यांना धरुन दिव्या शिंदेने आज मुंबईत पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत दिव्याने बिग बॉसमध्ये असताना जे काही शब्द उच्चारले, आणि जी भाषा वापरली त्यावर स्पष्टीकरण दिलं. काय म्हणाली दिव्या?

आज मुंबईत दिव्याची पत्रकार परिषद झाली. त्यात दिव्या म्हणाली, ''जे लोक वैचारिक आहेत त्यांच्यासाठी तलवार ही शाब्दिक आहे, स्वाभिमानी आहे, वैचारिक आहे, अभिमानाची आहे, माजाची आहे आणि मानाची आहे. हीच तलवार आपण घेऊन चाललोय. या संविधानिक देशात कोणी खरं खरंच तलवार थोडी घेऊन जाणार आहे. आणि त्यांनी मला फोर्स केला. मी १०० वेळा त्यांना घरामध्ये सांगितलंय की, मी बाहेरचं बोलणार नाही,  कोणी तितकं समजण्याच्या परिस्थितीमध्ये नाहीये.'' 


घराबाहेर आल्यावर दिव्याचा पहिला व्हिडीओ

दिव्या शिंदेने बिग बॉसच्या घराबाहेर आल्यावर तिच्या इन्स्टाग्राम हँडलवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. हा व्हिडीओ पोस्ट करुन दिव्या म्हणते, ''नमस्कार जय भीम, जय शिवराय! संपूर्ण महाराष्ट्रातूनच नव्हे तर भारतातून, परदेशातून तुम्ही मला जे आशीर्वाद, प्रेम आणि सपोर्ट दिलाय त्याच्यासाठी मी नेहमीच ऋणी आहे. लवकरच मी तुमच्यासमोर येईल. आता विषय संपला नाही तर विषय सुरु झालाय!'', अशा शब्दात स्पष्टपणे दिव्याने तिच्या चाहत्यांना संदेश दिला आहे.

दिव्याने पत्रकार परिषद घेतल्यावर अनेक मुद्द्यांवर भाष्य केलंय. याशिवाय ती भावुक होऊन तिला अश्रू अनावर झाल्याचंही समजतंय. पत्रकार परिषदेनंतर दिव्याची पुढची वाटचाल कशी असणार, याकडे सर्वांचं लक्ष आहे.

Web Title : बिग बॉस से निकलने के बाद दिव्या शिंदे ने 'तलवार' पर दी सफाई।

Web Summary : बिग बॉस मराठी 6 से बाहर होने के बाद, दिव्या शिंदे ने मुंबई में एक प्रेस कॉन्फ्रेंस की और अपने विवादास्पद 'तलवार' टिप्पणी को समझाया। उन्होंने जोर देकर कहा कि यह शब्द लाक्षणिक था, शाब्दिक धमकी नहीं।

Web Title : Divya Shinde clarifies 'sword' remarks after Bigg Boss eviction.

Web Summary : Evicted from Bigg Boss Marathi 6, Divya Shinde held a press conference in Mumbai to explain her controversial 'sword' remarks. She asserted the word was metaphorical and not a literal threat.