दिशा सालियनचा एक्स बॉयफ्रेंड चढणार बोहल्यावर; 'या' प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत बांधणार लग्नगाठ
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2023 16:56 IST2023-03-21T16:54:56+5:302023-03-21T16:56:00+5:30
Rohan rai: रोहन 'पिया अलबेला' मालिकेतील अभिनेत्रीसोबत लग्न करणार आहे.

दिशा सालियनचा एक्स बॉयफ्रेंड चढणार बोहल्यावर; 'या' प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत बांधणार लग्नगाठ
बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत (sushant singh rajput) आत्महत्या प्रकरणी त्याची मॅनेजर दिशा सालियन (disha salian) चांगलीच चर्चेत आली होती. मात्र, ८ जून २०२० रोजी दिशाचा राहत्या इमारतीच्या १४ व्या मजल्यावरुन खाली पडून मृत्यू झाला. तिच्या बरोबर ६ दिवसांनंतर सुशांतने आत्महत्या केली. त्यामुळे या दोघांच्या मृत्यूने कलाविश्वात मोठी खळबळ माजवली होती. विशेष म्हणजे दिशाच्या मृत्यूनंतर तिचा एक्स बॉयफ्रेंड रोहन राय आता लग्नाच्या बेडीत बांधला जाणार आहे.
दिशाचा प्रियकर अभिनेता रोहन राय लवकरच लग्न करणार असून तो 'पिया अलबेला' मालिकेतील शीन दास हिच्यासोबत सप्तपदी घेणार आहे. येत्या २२ एप्रिल रोजी काश्मीरमध्ये मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत ही जोडी लग्न करणार आहे.
रोहन आणि शीन यांची पहिली भेट पिया अलबेला मालिकेच्या सेटवर झाली. या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं आणि ही जोडी आता लग्न करणार आहे. दिशाच्या मृत्यूनंतर दु:खात बुडालेल्या रोहनला शीनाने आधार दिला. एका मुलाखतीत रोहनने याविषयी भाष्य केलं होतं. 'तिला विसरणं कठीण आहे. मी नवीन नात्याची सुरुवात करतोय यावर माझा अजुनही विश्वास नाही. पण, माझ्या अडचणीच्या काळात शीनने मला साथ दिली होती,' असं तो म्हणाला.