दिल है छोटासा! लतिकाने शेअर केला खास व्हिडीओ; अल्लडपणामुळे जिंकतीये नेटकऱ्यांची मनं
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2022 15:24 IST2022-01-26T15:22:12+5:302022-01-26T15:24:01+5:30
Akshaya naik: अक्षया इन्स्टाग्रामवर चांगलीच सक्रीय असून बऱ्याचदा ती तिचे फोटो, व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर करत असते.

दिल है छोटासा! लतिकाने शेअर केला खास व्हिडीओ; अल्लडपणामुळे जिंकतीये नेटकऱ्यांची मनं
छोट्या पडद्यावरची लतिका हे नाव आता कोणत्याही प्रेक्षकवर्गाला नवीन नाही. 'सुंदरा मनामध्ये भरली' (sundara manna madhe bharli) या मालिकेच्या माध्यमातून लतिका घराघरात पोहोचली. ही भूमिका अभिनेत्री अक्षया नाईक (akshaya naik) साकारत असून तिने अल्पावधीत प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. कलाविश्वाप्रमाणेच अक्षया सोशल मीडियावरही सक्रीय आहे. त्यामुळे अनेकदा ती तिचे डान्स व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर करत असते.
अक्षया इन्स्टाग्रामवर चांगलीच सक्रीय असून बऱ्याचदा ती तिचे फोटो, व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर करत असते. अलिकडेच तिने एक सुंदर फोटोशूट केलं होतं. या फोटोशूटचे काही फोटो तिने इन्स्टाग्रामवर शेअर करत नेटकऱ्यांची मनं जिंकली होती. त्यानंतर आता तिने पुन्हा एक डान्स व्हिडीओ शेअर केला आहे.
मकरसंक्रांत स्पेशल: लतिकाने केलं खास व्हिडीओ शूट; निखळ हास्यामुळे नेटकरी घायाळ
अक्षयाने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये ती दिल है छोटासा या गाण्यावर अल्लडपणे मस्ती करताना दिसत आहे. यावेळी तिने सुंदर प्रिंटेड वनपीस फ्रॉक परिधान केला आहे. त्यामुळे ती प्रचंड गोड दिसत आहे.