'बिग बॉस'मधून बाहेर आल्यावर ओंकार राऊतसोबत बोलणं झालं का? दिव्या शिंदे म्हणाली- "मला शंका आहे की... "

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2026 15:28 IST2026-02-18T15:25:03+5:302026-02-18T15:28:07+5:30

लोकमत फिल्मीला दिलेल्या मुलाखतीत दिव्याने आणखी एक खुलासा केला. आतापर्यंत जे स्पर्धक घराबाहेर पडलेत, त्यांच्यापैकी कोणाशी संपर्क झाला असं विचारल्यावर दिव्या काय म्हणाली बघा.

did Omkar Raut contact with divya shinde after coming out bigg boss marathi 6 | 'बिग बॉस'मधून बाहेर आल्यावर ओंकार राऊतसोबत बोलणं झालं का? दिव्या शिंदे म्हणाली- "मला शंका आहे की... "

'बिग बॉस'मधून बाहेर आल्यावर ओंकार राऊतसोबत बोलणं झालं का? दिव्या शिंदे म्हणाली- "मला शंका आहे की... "

'बिग बॉस मराठी ६'ची सध्या खूप चर्चा आहे. या शोचा आता सहावा आठवडा सुरु आहे. त्यामुळे शोमध्ये रंगत निर्माण झाली आहे. अशातच 'बिग बॉस मराठी ६'मध्ये एक घटना घडली ती म्हणजे दिव्या शिंदेला बिग बॉसने घराबाहेर काढलं. दिव्या शिंदेने घराबाहेर आल्यावर पत्रकार परिषदेत तिचे मुद्दे मांडले. अशातच लोकमत फिल्मीला दिलेल्या मुलाखतीत दिव्याने आणखी एक खुलासा केला. आतापर्यंत जे स्पर्धक घराबाहेर पडलेत, त्यांच्यापैकी कोणाशी संपर्क झाला असं विचारल्यावर दिव्या काय म्हणाली बघा.

'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!

दिव्या शिंदेचं परखड मत

लोकमत फिल्मीला दिलेल्या मुलाखतीत दिव्याने याविषयी खुलासा केला. घरात असताना दिव्याची करण सोनावणे, आयुष संजीव आणि ओमकार राऊतसोबत चांगली मैत्री होती. हे तिघेही आता घराबाहेर पडले आहेत. तिघांपैकी दिव्याचं कोणाशी बोलणं झालं का, असं विचारल्यावर दिव्या म्हणाली, ''माझ्या मते, त्यांना सांगितलं असावं दिव्यासोबत संपर्क करु नका. त्यांनी माझ्याशी संपर्क नाही केलाय. मला दाट शंका आहे की, त्यांना सांगितलंच असणारेय, तुम्ही दिव्याबद्दल बोलू नका.''

''माझ्या कानावर आलंय की, दिव्यासाठी याला होल्ड वर ठेव,  त्याला होल्ड वर ठेव. माझ्यासोबत मुलाखती करु नका. मला काय फरक पडणार आहे. माझा आवाज एवढा प्रखर आहे, कणखर आहे. या रुममध्ये बोललं तरी संपूर्ण महाराष्ट्राला ऐकू जाईल. कोण दाबू शकतं माझा आवाज? जेव्हा रात्रीनंतर दिवस येतो ना, तसं खोट्यानंतर खरं येतं. आणि मी या गोष्टीवर फार विश्वास ठेवते.'', असं दिव्या स्पष्टच म्हणाली. त्यामुळे घराबाहेर आलेल्या एकाही स्पर्धकाने दिव्याशी स्वतःहून संपर्क साधला नाहीये, याचा उलगडा झालाय.

Web Title : दिव्या शिंदे को शक है कि प्रतियोगियों को उससे संपर्क न करने को कहा गया।

Web Summary : बिग बॉस मराठी से बाहर हुईं दिव्या शिंदे को लगता है कि अन्य प्रतियोगियों को उनके निकलने के बाद उनसे संपर्क न करने के लिए कहा गया था। उन्हें लगता है कि उनकी आवाज को दबाया नहीं जा सकता और अंत में सच्चाई की जीत होती है।

Web Title : Divya Shinde suspects contestants were told not to contact her.

Web Summary : Evicted Bigg Boss Marathi contestant Divya Shinde believes other contestants were instructed to avoid contacting her after their eliminations. She feels her voice cannot be suppressed and truth prevails.