'जय श्री कृष्णा' मालिकेतील बालकृष्ण आठवतोय? आता लूकमध्ये झालाय मोठा बदल, Video व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2023 07:00 IST2023-06-17T07:00:00+5:302023-06-17T07:00:07+5:30
श्रीकृष्णाच्या बाललीला धृतीने पडद्यावर अगदी उत्तम साकारल्या.

'जय श्री कृष्णा' मालिकेतील बालकृष्ण आठवतोय? आता लूकमध्ये झालाय मोठा बदल, Video व्हायरल
टेलिव्हिजनवरील 'जय श्री कृष्णा' मालिकेतील बालकृष्णाची भूमिका साकारणारा कलाकार आठवतोय? आपल्या गोड हावभावाने आणि निरागस चेहऱ्याने ज्याने सर्वांनाच मंत्रमुग्ध केलं त्या बाळकृष्णाची भूमिका केली होती धृती भाटियाने (Dhriti Bhatia). आता धृती मोठी झाली असून तिला ओळखणंही कठीण झालंय. सोशल मीडियावरुन ती चाहत्यांसोबत फोटो शेअर करत असते.
श्रीकृष्णाच्या बाललीला धृतीने पडद्यावर अगदी उत्तम साकारल्या. तोच नटखटपणा, निरागसता, हावभाव या बालकलाकाराने अतिशय उत्तमपणे साकारले होते. श्रीकृष्णाच्या भूमिकेतील धृती अगदी शोभून दिसत होती. तिच्या अभिनयाने प्रेक्षक भारावून गेले. 'जय श्री कृष्णा' ही मालिका कलर्स वाहिनीवर 2008 साली प्रसारित झाली होती. १५ वर्षांनंतर धृती कशी दिसतेय बघा.
धृतीचा हा व्हिडिओ पाहून ओळखूही येत नाही की ही तीच बालकृष्णाची भूमिका साकारणारी कलाकार आहे. धृतीला डान्सची आवड आहे. ती डान्सचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते. भविष्यात तिची कोरिओग्राफर होण्याची इच्छा आहे. 'जय श्रीकृष्णा' शिवाय धृती 'इस प्यार को क्या नाम दू' मालिकेतही काही एपिसोड साठी झळकली होती. मात्र आता सध्या तिने मनोरंजनसृष्टीपासून दूर आहे.