महाशिवरात्रीनिमित्त पार्वतीचं गंगेत पवित्र स्नान, महाकुंभमधील व्हिडिओ शेअर करत म्हणाली...
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2025 16:50 IST2025-02-26T16:49:42+5:302025-02-26T16:50:17+5:30
शेवटच्या दिवशी महाशिवरात्रीचं निमित्त साधत टीव्हीची पार्वतीही महाकुंभमेळ्यात सहभागी झाली. याचा व्हिडिओ अभिनेत्रीने शेअर केला आहे.

महाशिवरात्रीनिमित्त पार्वतीचं गंगेत पवित्र स्नान, महाकुंभमधील व्हिडिओ शेअर करत म्हणाली...
महाकुंभमेळ्याचा आज शेवटचा दिवस आहे. गेल्या ४५ दिवसांत कोट्यवधी भाविकांनी कुंभमेळ्यात स्नान केलं. अनेक सेलिब्रिटीही महाकुंभमेळ्यात सहभागी झाले होते. आता शेवटच्या दिवशी महाशिवरात्रीचं निमित्त साधत टीव्हीची पार्वतीही महाकुंभमेळ्यात सहभागी झाली. याचा व्हिडिओ अभिनेत्रीने शेअर केला आहे.
देवों के देव महादेव या मालिकेत पार्वतीची भूमिका साकारून अभिनेत्री सोनारिका भदौरिया घराघरात पोहोचली. या मालिकेने तिला लोकप्रियता मिळवून दिली. इतर सेलिब्रिटीप्रमाणेच सोनारिकानेही महाकुंभमेळ्यात हजेरी लावली. सोनारिकाने त्रिवेणी संगम येथे डुबकी मारत गंगास्नान केलं. "माझ्या सर्व चांगल्या कर्मांचं फळ", असं तिने म्हटलं आहे. "काल हर, कष्ट हर, दुःख हर, दारिद्र्य हर, रोग हर, सर्व पाप हर || ॐ नमः पार्वती पतये हर हर महादेव हर हर गंगे", असं कॅप्शनही तिने व्हिडिओ दिला आहे. याव्यतिरिक्तही अनेक फोटो आणि व्हिडिओही तिने शेअर केले आहेत.
सोनारिका भदौरियाने अनेक टीव्ही मालिकांमध्ये काम केलं आहे. २०१९ मध्ये ती इश्क मे मरजावा मालिकेत दिसली होती. मात्र, त्यानंतर ती छोट्या पडद्यावर दिसली नाही. त्यानंतर काही म्युझिक अल्बममध्ये ती दिसली होती. गेल्या वर्षी अभिनेत्रीने लग्नाच्या बेडीत अडकत नव्या आयुष्याला सुरुवात केली.