पतीच्या कायदेशीर कारवाईनंतर दलजीत कौर पुन्हा केनियाला गेली, दुसरं लग्न टिकवणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2024 11:09 IST2024-06-12T11:09:01+5:302024-06-12T11:09:54+5:30

5 महिन्यांनी पुन्हा केनियाला परतली दलजीत कौर

Daljit Kaur went back to Kenya after 5 months shared photo with girls squad | पतीच्या कायदेशीर कारवाईनंतर दलजीत कौर पुन्हा केनियाला गेली, दुसरं लग्न टिकवणार?

पतीच्या कायदेशीर कारवाईनंतर दलजीत कौर पुन्हा केनियाला गेली, दुसरं लग्न टिकवणार?

टीव्ही अभिनेत्री दलजीत कौर (Dalljiet Kaur) सध्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. दुसऱ्या पतीचे विवाहबाह्य संबंध असल्याचा खुलासा तिने काही दिवसांपूर्वीच केला. तसंच त्याच्यावर सोशल मीडियावरुन अनेक आरोप लावले. या आरोपांना उत्तर देत निखिल पटेलने (Nikhil Patel) तिच्यावर कायदेशीर कारवाई केली. तिला केन्याला येऊन सामान घेऊन जाण्यास सांगितले. अन्यथा दान करण्यात येईल असा इशाराही दिला. पतीच्या या इशाऱ्यानंतर दलजीत केन्याला परतली आहे.

दलजीत कौरने  नुकताच केन्यामधून फोटो शेअर केला आहे. पहिल्या फोटोत तिने तिच्या खोलीतून केन्याचा व्ह्यू दाखवला आहे. तर आणखी एका फोटोत तिने दोन मैत्रिणींसोबत फोटो शेअर केला आहे. 'जेव्हा तुम्ही आपल्या गर्ल्स स्क्वॉडला भेटता' असं कॅप्शन तिने दिलं आहे. यात तिने नैरोबी, केन्या हे लोकेशन लिहिले आहे. 

दलजीत पाच महिन्यांनंतर केन्याला परतली आहे. ती तिचं सामान घेऊन येणार की लग्न टिकवण्याचे प्रयत्न करणार हे आता स्पष्ट होईल. दलजीतला पहिला पती शालीन भनोटपासून एक मुलगा आहे. तर निखिल पटेलला पहिल्या पत्नीपासून दोन मुली आहेत. दलजीत आणि निखिलचं लग्न अतिशय ग्रँड पद्धतीने झालं होतं. दलजीतने तिच्या लग्न, हनिमूनचे अनेक फोटो शेअर केले होते जे सोशल मीडियावर आहेत. लग्नानंतर १० च महिन्यात ती केन्यावरुन भारतात आली होती. 

Web Title: Daljit Kaur went back to Kenya after 5 months shared photo with girls squad