'चला हवा येऊ द्या' फेम अभिनेत्री श्रेया बुगडेची हवा 'जाऊ बाई गावात'मध्ये

By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2023 12:38 PM2023-12-23T12:38:59+5:302023-12-23T12:39:25+5:30

Shreya Bugde : प्रेक्षकांची उत्कंठा वाढवायला आणि मनोरंजनाची रंगतदार आतिषबाजी करायला या आठवड्याचा खास पाहुणा येत आहे गावात. मराठमोळी लाफ्टर क्वीन म्हणजेच श्रेया बुगडेचा धमाकेदार अंदाज 'जाऊ बाई गावातच्या' वीकेंडच्या भागात बघायला मिळणार आहे.

'Chala Hawa Yeu Dya' fame actress Shreya Bugde's Hawa in 'Jau Bai Gavaat' | 'चला हवा येऊ द्या' फेम अभिनेत्री श्रेया बुगडेची हवा 'जाऊ बाई गावात'मध्ये

'चला हवा येऊ द्या' फेम अभिनेत्री श्रेया बुगडेची हवा 'जाऊ बाई गावात'मध्ये

झी मराठीवरील जाऊ बाई गावात (Jau Bai Gavaat) या रिएलिटी शोने कमी कालावधीत चांगलीच लोकप्रियता मिळवली आहे. हा शोला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळत आहे. या शोमध्ये सहभागी झालेल्या स्पर्धकांना गावाकडच्या वातावरणात राहण्याचे चॅलेंज देण्यात आले आहे. शहरात अत्यंत ऐशोआरामात जीवन जगणाऱ्या काही तरुणींना काही दिवस आता एका खेडे गावात राहून तेथील कामे एका टास्क प्रमाणे करावे लागतील. तसेच या शोमध्ये दर आठवड्यात नवा पाहुणा हजेरी लावत असतो. आतापर्यंत क्रांती रेडकर, गश्मीर महाजनी, देवदत्त नागे, महेश मांजरेकर यांनी हजेरी लावली आहे. त्यानंतर आता चला हवा येऊ द्या शोमधील प्रसिद्ध अभिनेत्री श्रेया बुगडे (Shreya Bugde) हजेरी लावताना दिसणार आहे. 

प्रेक्षकांची उत्कंठा वाढवायला आणि मनोरंजनाची रंगतदार आतिषबाजी करायला या आठवड्याचा खास पाहुणा येत आहे  गावात. मराठमोळी लाफ्टर क्वीन म्हणजेच श्रेया बुगडेचा धमाकेदार अंदाज 'जाऊ बाई गावातच्या' वीकेंडच्या भागात बघायला  मिळणार आहे. हा नवीन पाहुणा ही रिकाम्या हाताने आला नाही. एक गमतीदार कार्य घेऊन आला आहे. 

श्रेया बुगडे आली आहे तर टास्क ही काही तरी  आगळा वेगळा असणार, हे तर खरं आहे.  स्पर्धकांना गावातल्या लाजाळू मुलां बरोबर डांस करायचा आहे. जितके सोप्पे ऐकायला वाटतंय तितकाच अवघड हे कार्य असणार. आता मजा येणार जेव्हा शहरातल्या मुली, गावातल्या  लाजाळू मुलांना आपल्या तालावर नाचवायचा प्रयत्न करणार. कोण होईल ह्या कार्यचा विजेता आणि श्रेया कशी करेल या स्पर्धकांची मदत बघायला खूप धमाल येणार आहे.

Web Title: 'Chala Hawa Yeu Dya' fame actress Shreya Bugde's Hawa in 'Jau Bai Gavaat'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.