Video: कोळीगीताची माधुरीला पडली भुरळ; वेसावची पारु वर केला डान्स
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2024 13:11 IST2024-01-04T13:10:41+5:302024-01-04T13:11:13+5:30
Madhuri dixit: माधुरीने अलिकडेच 'सूर नवा ध्यास नवा'च्या ग्रँड फिनालेला हजेरी लावली होती.

Video: कोळीगीताची माधुरीला पडली भुरळ; वेसावची पारु वर केला डान्स
90 चा काळ गाजवणारी लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे माधुरी दिक्षित (madhuri dixit). उत्तम अभिनयशैली, सौंदर्य आणि मधूर हास्य यांच्या जोरावर माधुरीने प्रेक्षकांना आपलंस केलं. विशेष म्हणजे दोन मुलांची आई असलेल्या माधुरीची लोकप्रियता अद्यापही कमी झालेली नाही. त्यामुळे तिची कायम चर्चा होत असते. सध्या माधुरी एका कोळी गाण्यामुळे चर्चेत आली आहे.
आपल्या नृत्यकौशल्यासाठी विशेष लोकप्रिय असलेल्या माधुरीने अलिकडेच 'सूर नवा ध्यास नवा'च्या ग्रँड फिनालेला हजेरी लावली होती. या कार्यक्रमात तिने चक्क वेसावची पारू या लोकप्रिय कोळी गीतावर डान्स केला. ‘सूर नवा ध्यास नवा’ या कार्यक्रमात विरारचा अनिमेष ठाकूर हा उपविजेता ठरला. या कार्यक्रमाच्या मंचावर अनिमेषने वेसावची पारू हे गाणं सादर केलं. विशेष म्हणजे त्याचा हा परफॉर्मन्स इतका गाजला की, माधुरीलाही या गाण्यावर डान्स करण्याचा मोह आवरला नाही.
दरम्यान, माधुरीसोबत डॉ. श्रीराम नेने यांनीही ताल धरला. त्यामुळे सध्या सोशल मीडियावर या जोडीचा डान्स व्हिडीओ व्हायरल होत आहे.