रितेश देशमुखचं 'बिग बॉस १७' मधील अभिषेक कुमारला समर्थन, पोस्ट करत म्हणाला...
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2024 18:51 IST2024-01-03T18:48:27+5:302024-01-03T18:51:23+5:30
नुकतेच बिग बॉसच्या घरात अभिषेक आणि ईशा-समर्थ यांच्यात यांच्यात वाद झाला.

रितेश देशमुखचं 'बिग बॉस १७' मधील अभिषेक कुमारला समर्थन, पोस्ट करत म्हणाला...
मनोरंजन जगतातील सर्वात वादग्रस्त शो म्हणजे 'बिग बॉस 17'. आता बिग बॉसच्या 17 वा सिझन फायनलकडे वळत आहेत. त्यामुळे जसजसा फिनाले जवळ येत आहे, तसतशी प्रेक्षकांची उत्सुकता आणि घरात वेगवेगळे ट्विस्ट होत आहेत. नुकतेच बिग बॉसच्या घरात अभिषेक आणि ईशा-समर्थ यांच्यात यांच्यात वाद झाला. यावर अनेकांनी अभिषेकला पाठिंबा दिला आहे. केवळ चाहतेच नाही तर अनेक सेलेब्सही अभिषेकचे कौतुक करत त्याला पाठिंबा देत आहेत.
बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुखनेदेखील अभिषेक कुमारला समर्थन दिलं आहे. रितेश देशमुखने अभिषेक कुमारसाठी xवर ट्विट केले. त्याने हे ट्विट बिग बॉसलाही टॅग केले आहे. 'अभिषेक कुमारची अवस्था पाहून खरोखरच खूप वाईट वाटतं आहे', अशी पोस्ट रितेशने केली आहे. तसेच अंकित गुप्ता, राजीव अडातिया आणि ऐश्वर्या शर्मा यांनी अभिषेकला पाठिंबा दिला आणि ईशा-समर्थ यांच्यावर कारवाई करण्याचे आवाहन बिग बॉसला केले.
Heart goes out to Abhishek #BiggBoss17
— Riteish Deshmukh (@Riteishd) January 2, 2024
'बिग बॉस 17' च्या एपिसोडमध्ये नॉमिनेशन टास्क दरम्यान समर्थ आणि ईशा जाणीवपूर्वक अभिषेकला चिडवताना दिसले. ईशा मालवीय आणि समर्थ जुरेल अभिषेकला खूप त्रास असल्याने अभिषेक कुमारच्या चाहत्यांसाठी बिग बॉस पाहणे खरोखर कठीण झालं आहे. ईशा आणि समर्थ अभिषेकशी छोट्या छोट्या गोष्टीवरून भांडण करत आहेत. त्यामुळे आता बिग बॉस आणि सलमान खान या घटनेनंतर काय शिक्षा करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सध्या घरात अंकिता लोखंडे, विकी जैन, मुनव्वर फारुकी, आयशा खान, ओरी, ईशा मालवीय, अभिषेक कुमार, समर्थ जुरेल, मन्नारा चोप्रा, अरुण महाशेट्टी, समर्थ जुरेल हे स्पर्धक आहेत. आता बिग बॉसच्या घरातून कोण बाहेर पडणार आणि बिग बॉसची ट्रॉफी कोण उंचावणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.