'कॉलेजमध्ये असताना लोक घाबरायचे, कारण..'; पंकजा मुंडेंनी सांगितला महाविद्यालयातील भन्नाट किस्सा
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2022 13:00 IST2022-08-12T13:00:00+5:302022-08-12T13:00:00+5:30
Pankaja munde: सध्या सोशल मीडियावर या कार्यक्रमाचा एक प्रोमो व्हायरल होत असून या व्हिडीओमध्ये त्यांनी कॉलेज जीवनातील जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे.

'कॉलेजमध्ये असताना लोक घाबरायचे, कारण..'; पंकजा मुंडेंनी सांगितला महाविद्यालयातील भन्नाट किस्सा
छोट्या पडद्यावर अलिकडेच बस बाई बस (bus bai bus) हा कार्यक्रम सुरु झाला आहे. हा शो सुरु झाल्यापासून अगदी पहिल्या भागापासून तो गाजताना दिसत आहे. आतापर्यंत या शो मध्ये खासदार सुप्रिया सुळे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस अशा राजकीय महिला व्यक्तिमत्त्वांनी हजेरी लावली. त्यानंतर आता या कार्यक्रमात भाजपा नेत्या पंकजा मुंडे (pankaja munde) हजेरी लावणार आहेत. सध्या सोशल मीडियावर या कार्यक्रमाचा एक प्रोमो व्हायरल होत असून या व्हिडीओमध्ये त्यांनी कॉलेज जीवनातील जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे.
'बस बाई बस' या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन अभिनेता सुबोध भावे करत असून तो कार्यक्रमात सहभागी झालेल्या सेलिब्रिटींकडून अनेक जुने किस्से जाणून घेत असतो. यावेळी तो पंकजा मुंडे यांना जुन्या काळात घेऊन गेला. यावेळी त्यांनी कॉलेजमध्ये असताना कसं वातावरण होतं हे सांगितलं.
"मी कॉलेजला असताना मुंडे साहेब गृहमंत्री होते. त्यामुळे त्यांच्यासोबत सुरक्षारक्षक कायम असायचे. त्यांच्याबरोबरीने माझ्यासोबतही सुरक्षारक्षक असायचे त्यामुळे मला महाविद्यालयीन जीवनाची मज्जाच घेता आली नाही. सुरक्षारक्षकांना पाहून लोक घाबरायचे. पण एकदा कोणाशी मैत्री झाली की ती शेवटपर्यंत असायची", असं पंकजा मुंडे म्हणाल्या.
दरम्यान, या कार्यक्रमामध्ये पंकजा मुंडे यांनी वैयक्तिक आयुष्यासोबतच राजकीय जीवनातीलदेखील अनेत गुपित उघड केली. सध्या या शोचा प्रोमो सोशल मीडियावर कमालीचा व्हायरल होत असून हा भाग पाहण्यासाठी प्रेक्षक आतुर असल्याचं पाहायला मिळत आहे.