​रेमोचा मुलगा डान्स चॅम्पियन्समधील स्पर्धक पियूष भगतचा सर्वात मोठा चाहता

By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2017 07:06 AM2017-11-09T07:06:57+5:302017-11-09T12:36:57+5:30

‘स्टार प्लस’वरील ‘डान्स चॅम्पियन्स’ हा  कार्यक्रम सध्या प्रेक्षकांची मने जिंकत आहे. या कार्यक्रमात एकाहून एक सरस नृत्य प्रेक्षकांना पाहायला ...

The biggest fan of contestant Piyush Bhagat of Remo's son Dance Champion | ​रेमोचा मुलगा डान्स चॅम्पियन्समधील स्पर्धक पियूष भगतचा सर्वात मोठा चाहता

​रेमोचा मुलगा डान्स चॅम्पियन्समधील स्पर्धक पियूष भगतचा सर्वात मोठा चाहता

googlenewsNext
्टार प्लस’वरील ‘डान्स चॅम्पियन्स’ हा  कार्यक्रम सध्या प्रेक्षकांची मने जिंकत आहे. या कार्यक्रमात एकाहून एक सरस नृत्य प्रेक्षकांना पाहायला मिळत आहेत. ‘डान्स चॅम्पियन्स’ या कार्यक्रमात नृत्यविषयक रिअ‍ॅलिटी कार्यक्रमांचे विजेते आणि उपविजेते यांच्यातील स्पर्धा आपल्याला पाहायला मिळत आहे. या कार्यक्रमातील अटीतटीच्या स्पर्धेत जो विजयी ठरेल, तो देशातील सर्वोत्कृष्ट नर्तक ठरणार आहे. या सगळ्याच स्पर्धकांनी अनेक रिअॅलिटी शो मध्ये भाग घेतला आहे. त्यामुळे हे सगळेच स्पर्धक एकमेकांना तगडी टक्कर देत आहेत.
‘स्टार प्लस’वरील ‘डान्स चॅम्पियन्स’ या नृत्यविषयक रिअ‍ॅलिटी कार्यक्रमात टेरेन्स आणि रेमो डिसुझा हे आपल्याला परीक्षकाच्या भूमिकेत पाहायला मिळत आहेत. ते दोघे अनेक वर्षांनंतर एकत्र काम करत आहेत. रेमो आणि टेरेन्स खूपच चांगल्या प्रकारे सगळ्या स्पर्धकांचे मार्गदर्शन करत असल्याने स्पर्धक खूप चांगले परफॉर्मन्स सादर करत आहेत. हा कार्यक्रम सुरू होऊन काही आठवडे झाले असून या स्पर्धकांचा आता एक चाहता वर्ग देखील बनला आहे. त्यांचे चाहते सोशल मीडियाच्या मार्फत त्यांना त्यांच्या आवडत्या स्पर्धकांचा डान्स किती आवडला हे आवर्जून सांगत आहेत. या कार्यक्रमातील स्पर्धक पियूष भगत खूपच चांगला डान्स करतो. त्यामुळे अनेकजण त्याचे चाहते आहेत. रेमो डिसुझाचा मुलगा गॅब्रिएल देखील त्याचा मोठा चाहाता आहे. तो त्याचा कोणताच डान्स पाहाणे मिस करत नाही. नुकताच तो डान्स चॅम्पियन्सच्या सेटवर खास पियुषचा डान्स पाहाण्यासाठी आला होता. त्याने सेटवर येऊन पियुषची भेट घेतली आणि पियुषचे आपण चाहाते असल्याचे त्याने सगळ्यांना सांगितले. आपला मुलगा आणि पियूष यांच्यातील हे नाते बघून रेमो थक्क झाला होता. गॅब्रिएल पियूषच्या नृत्यकौशल्याने अक्षरशः भारावून गेला होता. पियूषची गेट्टो ही नृत्यशैली पाहून आपण अचंबित झालो असून आपण ती एके दिवशी त्याच्याकडून नक्कीच शिकणार आहोत असे त्याने सगळ्यांना सांगितले. त्यानंतर रेमो, पियूष आणि गॅब्रिएल यांनी पिंगा या गाण्यावर पियूषने बसविलेल्या नृत्यशैलीत नृत्यही सादर केले.

Also Read : ‘डान्स चॅम्पियन्स’ची परीक्षक बनणार दीक्षित?

Web Title: The biggest fan of contestant Piyush Bhagat of Remo's son Dance Champion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.