VIDEO: आली लहर केला कहर...! साखळ्या, कुलूपांचा नेकपीस घालून टॉपलेस फिरताना दिसली उर्फी जावेद
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2022 18:38 IST2022-03-10T18:33:11+5:302022-03-10T18:38:57+5:30
Urfi Javed : ‘बिग बॉस ओटीटी’ फेम उर्फी सतत चर्चेत असते ती तिच्या फॅशन सेन्समुळे. आता तर तिने कहरच केला. बोल्डनेसच्या सर्व मर्यादा लांघत, उर्फी मुंबईच्या रस्त्यावर बिनधास्त फिरताना दिसली. तिला पाहून सगळेच थक्क झालेत.

VIDEO: आली लहर केला कहर...! साखळ्या, कुलूपांचा नेकपीस घालून टॉपलेस फिरताना दिसली उर्फी जावेद
बिग बॉस ओटीटीमुळे प्रकाशझोतात आलेली अभिनेत्री उर्फी जावेद (Urfi Javed) तिच्या चित्रविचित्र कपड्यांमुळे सतत चर्चेत असते. आता तर तिने कहरच केला. बोल्डनेसच्या सर्व मर्यादा लांघत, उर्फी मुंबईच्या रस्त्यावर बिनधास्त फिरताना दिसली. तिला पाहून सगळेच थक्क झालेत.
टॉप न घालता गळ्यात फक्त साखळ्या व कुलूप असलेला नेकपीस घालून उर्फी मुंबईच्या रस्त्यावर फिरताना दिसली. गळ्यात खूप सारख्या साखळ्या आणि त्यात निळ्या व गुलाबी रंगाची कुलूप आणि सेफ्टीपिन्स आणि खाली बिकिनी बॉटम व जाळीदार स्कर्ट असा तिचा लूक पाहून सगळेच हैराण झालेत.
या लुकमधील तिचा व्हिडीओ सोशल मीडियावरही व्हायरल झाला. मग काय,नेहमीप्रमाणे उर्फी ट्रोल झाली. बिचारीकडे कपडे नाहीत, असं एका युजरने लिहिलं. ही कोणत्या प्लॅनेटवरून आलीये, अशी कमेंट अन्य एका युजरने केली.
‘बिग बॉस ओटीटी’ आधी उर्फी जावेद हे नाव फार कोणी ओळखत नव्हतं. म्हणायला या शोमध्ये उर्फी फक्त आठवडाभर राहिली. पण तिथून कदाचित सतत चर्चेत राहण्याचं कौशल्य पूरेपूर शिकून आली. होय, ‘बिग बॉस ओटीटी’ फेम उर्फी सतत चर्चेत असते ती तिच्या फॅशन सेन्समुळे. अनेकदा ती बोल्ड, ग्लॅमरस कपडे घालून मिरवताना दिसते आणि यामुळे दर दिवसाआड सोशल मीडियावर ट्रेंड करते. अनेकदा कपड्यांमुळे उर्फी ट्रोलही होते. पण बिनधास्त, बेफिक्रे उफीर्ला यामुळे जराही फरक पडत नाही. उर्फी चंद्र नंदिनी, मेरी दुर्गा, बेपन्नाह, जिजी माँ आणि दयान सारख्या टीव्ही शोमध्ये दिसली आहे. उर्फी जावेदने बिग बॉस ओटीटीत धमाकेदार एन्ट्री घेतली होती. मात्र 8 व्या दिवशीच ती घरातून बेदखल झाली. तेव्हापासून ती कपड्यांमुळेच चर्चेत असते.