लिव्हरच्या गंभीर आजाराचा सामना करतेय 'बिग बॉस' फेम अभिनेत्री, म्हणाली- "मला लिव्हर ट्रान्सप्लांट..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2025 17:37 IST2025-06-13T17:36:54+5:302025-06-13T17:37:51+5:30

Sana Makbul Liver Cirrhosis: 'बिग बॉस' फेम अभिनेत्रीला लिव्हरचा गंभीर आजार, म्हणाली- "लिव्हर ट्रान्सप्लांट..."

bigg boss ott fame sana makbul suffered with liver cirrhosis gives health update | लिव्हरच्या गंभीर आजाराचा सामना करतेय 'बिग बॉस' फेम अभिनेत्री, म्हणाली- "मला लिव्हर ट्रान्सप्लांट..."

लिव्हरच्या गंभीर आजाराचा सामना करतेय 'बिग बॉस' फेम अभिनेत्री, म्हणाली- "मला लिव्हर ट्रान्सप्लांट..."

Sana Makbul Health Update: टीव्ही अभिनेत्री आणि बिग बॉस ओटीटी ३ विनर सना मकबुलने काही दिवसांपूर्वीच हॉस्पिटलमधला फोटो शेअर केला होता. त्यामुळे तिचे चाहते चिंतेत होते. आता सनाने तिला गंभीर आजार झाल्याचं सांगितलं आहे. सना सध्या लिव्हर सिरोसिस या गंभीर आजाराचा सामना करत आहे. यावर सध्या ती उपचार घेत असून अभिनेत्रीने तिचे हेल्थ अपडेट दिले आहेत. 

सनाने नुकतीच हिंदुस्तान टाइम्सला तिला झालेल्या आजाराबद्दल माहिती दिली. ती म्हणाली, "मी गेल्या काही दिवसांपासून ऑटोइम्यून हेपेटायटिसचा सामना करत आहे. पण, दिवसेंदिवस तब्येत खराब होत आहे. माझ्या इम्युन सिस्टिमने लिव्हरवर परिणाम करणं सुरू केलं आहे. नुकतंच मला लिव्हर सिरोसिस झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. या कठीण काळातही मी खंबीर राहण्याचा प्रयत्न करत आहे. लिव्हर ट्रान्सप्लांट करावं लागू नये यासाठी डॉक्टर आणि मी प्रयत्न करत आहोत. माझी इम्यूनोथेरेपीही सुरू झाली आहे. फक्त लिव्हर ट्रान्सप्लांट स्टेजला हा आजार जाऊ नये, हीच माझी इच्छा आहे. ही सोपी गोष्ट नाही. पण मी हार मानणार नाही". 


"मी गेल्या अनेक काळापासून याचा सामना करत आहे. पण, आता हा आजार खूप वाढला आहे. यामुळे मी कामातूनही ब्रेक घेतला आहे. मी यशस्वी होण्यासाठी खूप मेहनत घेतली आहे. आणि आता सगळं व्यवस्थित सुरू असताना माझ्या आरोग्य चांगलं नाही. यासाठी मला वाईट वाटत आहे", असंही सनाने म्हटलं आहे. 

Web Title: bigg boss ott fame sana makbul suffered with liver cirrhosis gives health update