'बिग बॉस' फेम अभिनेत्रीने गाठला दिवाळीचा मुहुर्त, घरी आणली नवी कोरी मर्सिडीज

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2024 09:26 IST2024-11-01T09:25:35+5:302024-11-01T09:26:59+5:30

एका बिग बॉस फेम अभिनेत्रीनेही दिवाळीचा मुहुर्त गाठला आहे. दिवाळीच्या मुहुर्तावर बिग बॉस ओटीटी फेम सना मकबुलने नवी कोरी कार खरेदी केली आहे. 

bigg boss ott 3 fame sana makbul buys mercedes benz on the occassion of diwali | 'बिग बॉस' फेम अभिनेत्रीने गाठला दिवाळीचा मुहुर्त, घरी आणली नवी कोरी मर्सिडीज

'बिग बॉस' फेम अभिनेत्रीने गाठला दिवाळीचा मुहुर्त, घरी आणली नवी कोरी मर्सिडीज

दरवर्षी सेलिब्रिटीही मोठ्या उत्साहाने दिवाळी साजरी करतात. दिवाळीच्या मुहुर्तावर अनेक सेलिब्रिटी नव्या प्रवासाची सुरुवात करतात. घर, सोनं आणि गाडी खरेदी करण्यालाही सेलिब्रिटी पसंती दर्शवितात. एका बिग बॉस फेम अभिनेत्रीनेही दिवाळीचा मुहुर्त गाठला आहे. दिवाळीच्या मुहुर्तावर बिग बॉस ओटीटी फेम सना मकबुलने नवी कोरी कार खरेदी केली आहे. 

सनाने दिवाळीला स्वत:लाच एक खास गिफ्ट दिलं आहे. मर्सिडीज कंपनीची महागडी कार सनाने दिवाळीच्या दिवशी घरी आणली आहे. सनाच्या या नव्या कोऱ्या कारचे फोटो विरल भय्यानी या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आले आहेत. या फोटोंमध्ये नवीन गाडी खरेदी केल्याचा आनंद सनाच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत आहे. 


सनाने अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. तेलुगु आणि तमिळ सिनेमांमध्येही ती झळकली आहे. इस प्यार को क्या नाम दू या मालिकेने सनाला ओळख मिळवून दिली. बिग बॉस ओटीटीमुळे सना प्रसिद्धीझोतात आली. बिग बॉस ओटीटी ३ची ती विजेती होती. 

Web Title: bigg boss ott 3 fame sana makbul buys mercedes benz on the occassion of diwali