निक्की सोडून संपूर्ण घर नॉमिनेट, ग्रँड फिनालेपूर्वी Mid-Week एलिमिनेशन, कोण होणार बेघर ?
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2024 10:26 IST2024-10-01T10:25:54+5:302024-10-01T10:26:23+5:30
यंदाचं पाचवं पर्व अवघ्या ७० दिवसांमध्ये प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे.

निक्की सोडून संपूर्ण घर नॉमिनेट, ग्रँड फिनालेपूर्वी Mid-Week एलिमिनेशन, कोण होणार बेघर ?
Bigg Boss Marathi Season 5 : 'बिग बॉस मराठी'चा पाचवा सीझन सध्या अंतिम टप्प्यात येऊन पोहोचला आहे. रविवारी पंढरीनाथ कांबळेने 'बिग बॉस मराठी'च्या घराचा निरोप घेतला. त्यानंतर आता घरात ७ सदस्य राहिले आहेत. 'बिग बॉस'च्या ट्रॉफीवर नाव कोरण्यासाठी सदस्यांमध्ये रस्सीखेच पाहायला मिळालं. यावेळी निक्की सोडून संपुर्ण घर हे नॉमिनेट झालं आहे.
अशातच आता 'बिग बॉस मराठी'च्या घरात तिकीट टू फिनालेचा टास्क रंगला. यावेळी इनव्हेस्टमेंट बॉक्समधील पॉईंट्स जास्त असल्याने निक्की ही तिकीट टू फिनालेचा उमेदवार ठरली. तर टास्कमध्ये सूरजलाही हरवून ती थेट 'बिग बॉस मराठी'च्या ग्रँड फिनालेमध्ये पोहोचली. तर घरातील उर्वरीत सदस्य हे नॉमिनेट झाले.
वर्षा, जान्हवी, धनंजय, अंकिता, अभिजीत आणि सूरज हे सात सदस्य नॉमिनेटेड आहेत. Mid-Week एलिमिनेशन लवकरच पार पडेल असे संकेत ‘बिग बॉस’कडून घरातील सदस्यांना देण्यात आले आहेत. कारण, या आठवड्यात व्होटिंग लाईन्स या फक्त २ ऑक्टोंबरपर्यंत सुरू राहणार आहेत. त्यामुळे व्होटिंगनुसार Mid-Week एलिमिनेशनमध्ये कोण घराचा निरोप घेणार हे येत्या एपिसोडमध्ये स्पष्ट होईल.