Bigg Boss Marathi 5: 'बिग बॉस मराठी'च्या घरात रंगलीय वर्षा ताईंची चर्चा; हे आहे कारण
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2024 14:04 IST2024-09-11T14:03:22+5:302024-09-11T14:04:10+5:30
Bigg Boss Marathi Season 5 :'बिग बॉस मराठी'च्या घरातील वर्षा ताई नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत येत असतात. आजही घरातील सदस्य त्यांच्याबद्दल बोलताना दिसणार आहेत.

Bigg Boss Marathi 5: 'बिग बॉस मराठी'च्या घरात रंगलीय वर्षा ताईंची चर्चा; हे आहे कारण
'बिग बॉस मराठी'(Bigg Boss Marathi Season 5)च्या घरातील वर्षा ताई (Varsha Usgaonkar) नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत येत असतात. आजही घरातील सदस्य त्यांच्याबद्दल बोलताना दिसणार आहेत. अंकिता, पॅडी आणि सूरज गार्डन एरियामध्ये वर्षा ताईंबद्दल बोलताना दिसणार आहेत. अंकिता म्हणतेय,"जी गोष्ट आपल्याला जमत नाही..त्यातून लांब व्हा". तर पॅडी दादा म्हणतोय सॉरी बोलून विषय संपवायला हवा.
निक्की आणि वर्षा ताईंमध्येदेखील भाजीवरुन वाद झालेला पाहायला मिळाला. त्यानंतर निक्की वर्षा ताईंना म्हणतेय,"आता दुसरं काय फेकायचं याचं प्लॅनिंग करताय का?". निक्कीच्या बोलण्यावर वर्षा ताई म्हणत आहेत,"असं हवेत उडवते मी". पुढे निक्की आणि अरबाज वर्षा ताईंबद्दल बोलताना दिसून येतील.
आज वर्षा उसगांवकर आणि निक्की तांबोळी यांच्यात बिग बॉस मराठीच्या घरातील पहिल्या दिवसापासूनच ‘तू तू मैं मैं’ पाहायला मिळत आहे. आज पॅडी दादा अंकिताला म्हणताना दिसणार आहे की,"एका लेव्हलनंतर वर्षा ताईंवर आपण आवाज वाढवू शकत नाही". एकंदरीतच वर्षा ताईंनी भाजी फेकलेली घरातील कोणत्याच सदस्याला आवडलेले दिसत नाही.
अभिजीत निक्कीचं भांडण सुरूच
'बिग बॉस मराठी'च्या आजच्या भागात अभिजीत आणि निक्कीचं नॉमिनेशनवरुन भांडण झालेलं पाहायला मिळणार आहे. अभिजीत निक्कीला म्हणतोय,"नॉमिनेशनचा आणि जान्हवीचा काय संबंध". निक्की म्हणतेय,"जान्हवी तुला तुझ्या टीममध्ये हवी होती". या आठवड्यात निक्की नॉमिनेट झाल्याने ती अभिजीतकडे आपला संताप व्यक्त करत आहे.