"तुम्ही फक्त तोंड बघा...", उत्कर्ष शिंदेनं वर्षा उसगावकरांच्या समर्थनात स्पर्धकांना लगावला टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2024 16:44 IST2024-08-02T16:38:03+5:302024-08-02T16:44:40+5:30

उत्कर्षने इन्स्टाग्रामवर अभिनेत्री वर्षा उसगावकर यांचं समर्थन करत एक स्टोरी शेअर केली आहे.

bigg boss marathi season 5 utkarsh shinde share story on social media to support actress varsha usgaonkar  | "तुम्ही फक्त तोंड बघा...", उत्कर्ष शिंदेनं वर्षा उसगावकरांच्या समर्थनात स्पर्धकांना लगावला टोला

"तुम्ही फक्त तोंड बघा...", उत्कर्ष शिंदेनं वर्षा उसगावकरांच्या समर्थनात स्पर्धकांना लगावला टोला

Bigg Boss Marathi Season 5 : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम म्हणजे बिग बॉस. सध्या कलर्स मराठी वाहिनीवर या कार्यक्रमाच्या पाचव्या पर्वाला नुकतीच सुरूवात झाली आहे. यंदाच्या बिग बॉसच्या या पर्वात किर्तनकारांपासून ते सोशल मीडिया क्रिएटर्स सगळेच पाहायला मिळत आहेत. अशातच बिग बॉसच्या घरात पहिल्या आठवड्यातच स्पर्धकांमध्ये चांगलीच जुंपल्याचं चित्र पाहायला मिळालं. बिग बॉसच्या घरात वर्षा उसगावकर आणि निक्की तांबोळी यांच्यामध्ये मेकअपवरुन वाद झाला. अगदी पहिल्याच दिवसापासून स्पर्धकांनी घरात धुमाकूळ घातला.  

दरम्यान, बिग बॉसच्या घरात निक्की तांबोळीने वर्षा उसगावकरांचा केलेला अपमान पाहून नेटकऱ्यांनी निक्कीची चांगलीच शाळा घेतली. वर्षा उसगावकरांच्या समर्थनार्थ अनेकांनी निक्कीच्या वक्तव्याचा सोशल मीडियाच्या माध्यमातून निषेध नोंदवला. त्यात मराठी कलाकारही कुठे मागे राहिले नाही. अशातच बिग बॉस मराठीचा माजी स्पर्धक उत्कर्ष शिंदेने यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवरून त्याने स्टोरी शेअर करत बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वातील स्पर्धकांना धारेवर धरलं आहे. 

उत्कर्षने इन्स्टाग्रामवर अभिनेत्री वर्षा उसगावकर यांचं समर्थन करत एक स्टोरी शेअर केली आहे. या स्टोरीमध्ये एक फोटो शेअर करत त्याने लिहलंय, "त्या खेळत आहेत तुम्ही फक्त तोंड बघा" या फोटोमध्ये वर्षा उसगावकर मेकअप करत आहेत आणि घरातील इतर स्पर्धक त्यांच्याकडे पाहताना दिसतायत. योगिता चव्हाण, निखिल दामले, जान्हवी किल्लेकर आणि धनंजय पोवार त्यांच्याकडे एकटक पाहत आहेत. असा फोटो आपल्या इन्स्टाग्राम स्टोरावर शेअर करत उत्कर्षने बिग बॉसच्या घरातील स्पर्धकांना टोला लगावला आहे. 

Web Title: bigg boss marathi season 5 utkarsh shinde share story on social media to support actress varsha usgaonkar