Nikki Tamboli : "सगळेच मला तुझ्यापासून लांब करतात..."; वाद मिटवण्यासाठी निक्कीने अरबाजला दिलं सॉल्यूशन
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2024 13:29 IST2024-08-29T13:21:02+5:302024-08-29T13:29:32+5:30
Bigg Boss Marathi Season 5 Nikki Tamboli And Arbaz Patel : निक्की आणि अरबाजमध्ये प्रचंड खटके उडाले. मात्र आता वाद मिटवण्यासाठी निक्की आणि अरबाजमध्ये चर्चा झालेली पाहायला मिळत आहे.

Nikki Tamboli : "सगळेच मला तुझ्यापासून लांब करतात..."; वाद मिटवण्यासाठी निक्कीने अरबाजला दिलं सॉल्यूशन
Bigg Boss Marathi Season 5 : बिग बॉस मराठीच्या नव्या सीझनमध्ये दिवसागणिक रंगत पाहायला मिळत आहे. हा आठवडा गाजला तो फक्त आणि फक्त निक्की तांबोळी आणि अरबाज पटेल यांच्यातील जोरदार भांडणामुळे. भाऊच्या धक्क्यावर अभिनेता रितेश देशमुखने निक्कीसमोर ग्रुप A ची पोलखोल केली. त्यानंतर निक्की प्रचंड चिडली आणि तिने ग्रुप A सोडण्याचा निर्णय घेतला. तसेच त्या टीममधील कोणत्याही सदस्याला ट्रॉफी उचलू देणार नाही असंही सांगितलं.
निक्कीच्या या निर्णयावर अरबाजसह जान्हवी, वैभव आणि घनश्याम प्रचंड चिडले. त्यांनी देखील आपली मतं मांडली. यानंतर निक्की आणि अरबाजमध्ये प्रचंड खटके उडाले. दोघांच्या भांडणामध्ये अरबाजने भांडी फोडली, खूर्ची तोडली. रागाच्या भरात त्याने बिग बॉसच्या घरातील प्रॉपर्टीचं नुकसान केलं. मात्र आता वाद मिटवण्यासाठी निक्की आणि अरबाजमध्ये चर्चा झालेली पाहायला मिळत आहे.
निक्की म्हणते, "प्रोब्लेम भरपूर होतील, मी तुला एक सॉल्यूशन देऊ का?, गुड टर्मवर एन्ड करुया. या घरात आपल्याला राहायचं आहे खूप दिवस. त्यामुळे सोबत नको खेळूया पण हसता-खेळता चेहरा, स्माईल करून राहूद्या." त्यावर अरबाज म्हणतो की, "तू आल्यावर मी उठून जातो. मला तो पूर्ण महिना रिमांड झाला. तू काय म्हणाली, मला बोलता येत नाही". त्यावर निक्की म्हणाली की, "तुला एक्स्प्रेस करता येत नाही?"
"मी तुझ्याजवळ आल्यावर सर्वांनी कसा ड्रामा केला हे तुला माहितीय. तेव्हा माझ्या मनात असा विचार आला की, सगळेच मला तुझ्यापासून लांब करतात आणि आपल्या पर्सनल गोष्टी तू सर्वांसोबत शेअर करत असल्याने मला पर्सनल डिस्टेन्स ठेवायचा आहे." दोघांमध्ये झालेल्या या संभाषणानंतर यांच्यातील भांडण खरंच मिटणार का? हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. सध्या निक्की घराची कॅप्टन आहे.