Bigg Boss Marathi Season 5 : 'बिग बॉस मराठी'च्या घरात इरिना गिरवतेय मराठीचे धडे
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2024 13:40 IST2024-08-02T13:39:21+5:302024-08-02T13:40:16+5:30
Bigg Boss Marathi Season 5 : बिग बॉस मराठीच्या घरात इतिहासात जे घडलं नाही ते घडताना दिसत आहे. फॉरेनर, युक्रेनची मुलगी इरिना रूडाकोवा (Irina Rudakova) 'बिग बॉस मराठी'च्या घरात आंतरराष्ट्रीय स्टाईलने कल्ला करताना दिसत आहे.

Bigg Boss Marathi Season 5 : 'बिग बॉस मराठी'च्या घरात इरिना गिरवतेय मराठीचे धडे
बिग बॉस मराठीचा पाचवा सीझन (Bigg Boss Marathi 5) नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला. पहिल्या दिवसापासून या सीझनला प्रेक्षकांची पसंती मिळताना दिसत आहे. बिग बॉस मराठीच्या घरात इतिहासात जे घडलं नाही ते घडताना दिसत आहे. फॉरेनर, युक्रेनची मुलगी इरिना रूडाकोवा (Irina Rudakova) 'बिग बॉस मराठी'च्या घरात आंतरराष्ट्रीय स्टाईलने कल्ला करताना दिसत आहे. आता बिग बॉस मराठीच्या घरात इरिना मराठीचे धडे गिरवताना दिसत आहे. इरिनाची मराठी भाषा शिकण्याची धडपड, तिचा मराठी भाषेतला गोडवा 'बिग बॉस'प्रेमींच्या चांगलाच पसंतीस उतरत आहे.
'बिग बॉस मराठी'चा नवा प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या प्रोमोमध्ये अंकिता वालावलकर इरिनाला तिची भाषा शिकवताना दिसत आहे. अंकिता इरिनाला शिकवतेय,"माका सांगू नको". त्यानंतर इरिनादेखील "माका सांगू नको" म्हणताना दिसत आहे. त्यानंतर इरिना म्हणते,"राम कृष्ण हरी". इरिनाच्या मराठी शिकण्याच्या धडपडीवर घरातील इतर सदस्य तिचं कौतुक करताना दिसत आहेत. त्यानंतर वैभव चव्हाणला ती "तुम्ही कसे आहात हे विचारते". त्यावर वैभव म्हणतो,"मी एकदम मस्त".
इरिना सूरजला म्हणाली,"बकरी"
आजच्या भागात गोलीगत सूरज चव्हाण इरिनाला डान्स करायलादेखील लावतो. त्यानंतर इरिना सूरजसारखा डान्स करताना दिसेल. पुढे इरिना सूरजला 'बकरी' म्हणते. त्यावर सूरज तिला "मी शेर आहे" असं म्हणतो. त्यावर इरिना त्याला "मी किंग कोब्रा आहे" असं म्हणते. आर्या आणि जान्हवीचा प्रोमोमधील पंगा पाहून 'बिग बॉस मराठी'च्या आजच्या भागात काय घडतंय हे बघण्याची प्रेक्षकांची उत्सुकता अजूनच वाढली आहे.