'बिग बॉस मराठी' फेम सूरज चव्हाणने घेतली अजित पवारांची भेट; कारण आहे खूप खास
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2025 14:46 IST2025-11-13T14:45:15+5:302025-11-13T14:46:11+5:30
सूरज चव्हाणने उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट घेतली. या भेटीचं कारण एकदम खास ठरलं. जाणून घ्या

'बिग बॉस मराठी' फेम सूरज चव्हाणने घेतली अजित पवारांची भेट; कारण आहे खूप खास
'बिग बॉस मराठी ५'चा विजेता आणि अभिनेता सूरज चव्हाण विविध कारणांमुळे चर्चेत असतो. सूरजचे रिल व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात. अशातच सूरजविषयी एक मोठी बातमी समोर आली आहे. सूरज चव्हाणने अजित पवार यांची भेट घेतली आहे. या भेटीमागे खास कारण ठरलंय. स्वतः अजित पवारांनी सूरजसोबतचे फोटो शेअर करत या खास कारणाचा उल्लेख केलाय. जाणून घ्या
सूरज-अजित पवारांची भेट, कारण...
सूरज चव्हाणने अजित पवारांची भेट घेण्यामागे एक खास कारण ठरलंय. स्वतः अजित पवारांनी ट्विट करुन याविषयी माहिती दिली आहे. त्यांनी सूरजला पुष्पगुच्छ देण्याचे फोटो शेअर करुन लिहिलंय की, ''बारामतीचा सुपुत्र आणि बिग बॉस मराठी विजेता सुरज चव्हाण यानं आज माझी सदिच्छा भेट घेतली. त्याच्या नवीन घराचं बांधकाम उत्तमरित्या पार पडत असून त्याबद्दल त्यानं माझ्याकडे समाधान व्यक्त केलं. यावेळी सुरजला पुढील वाटचालीसाठी, आयुष्यातील नव्या टप्प्यासाठी शुभेच्छा दिल्या.''
सूरजने 'बिग बॉस मराठी ५' जिंकल्यावर अजित पवारांनी त्याला घर बांधून देण्याचं आश्वासन दिलं होतं. गेले वर्षभर सूरजच्या घराचं बांधकाम जोरात सुरु आहे. हे बांधकाम आता अंतिम टप्प्यात असून सूरज लवकरच या नवीन घरात राहायला जाईल.
बारामतीचा सुपुत्र आणि बिग बॉस मराठी विजेता सुरज चव्हाण यानं आज माझी सदिच्छा भेट घेतली. त्याच्या नवीन घराचं बांधकाम उत्तमरित्या पार पडत असून त्याबद्दल त्यानं माझ्याकडे समाधान व्यक्त केलं. यावेळी सुरजला पुढील वाटचालीसाठी, आयुष्यातील नव्या टप्प्यासाठी शुभेच्छा दिल्या. pic.twitter.com/UJkE7ko41E
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) November 13, 2025
सूरज बांधणार लग्नगाठ
सूरज चव्हाण लवकरच संजना हिच्यासोबत लग्नबंधनात अडकणार आहे. त्यांच्या लग्नाला आता काहीच दिवस उरले आहेत. सूरज चव्हाणचा लग्नसोहळा हा २९ नोव्हेंबर रोजी पार पडणार आहे. त्यांचा हा पारंपरिक विवाह सोहळा पुण्याजवळील जेजूरी, सासवड येथे होणार असल्याची माहिती समोर येत आहे. लग्नाच्या मुख्य समारंभापूर्वीचे विधी २८ नोव्हेंबरपासून सुरू होणार आहेत. या समारंभात हळद, मेहंदी आणि संगीत यांसारखे पारंपरिक समारंभ पार पडतील. या सोहळ्यासाठी सूरजचे नवीन घर खास सजावट करून तयार होणार आहे.