हत्ती, मोर अन् 'झापुक झुपूक'; संजनाच्या हातावर रंगली सूरज चव्हाणच्या नावाची मेहेंदी, फोटो समोर
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2025 13:13 IST2025-11-27T13:12:53+5:302025-11-27T13:13:52+5:30
संजनाच्या हातावर सूरजचं नाव; झापूक झुपूकच्या मेहेंदी सोहळ्याचे फोटो समोर

हत्ती, मोर अन् 'झापुक झुपूक'; संजनाच्या हातावर रंगली सूरज चव्हाणच्या नावाची मेहेंदी, फोटो समोर
बिग बॉस मराठी फेम आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर सूरज चव्हाण लवकरच बोहल्यावर चढणार आहे. सूरजच्या घरी लग्नाची जय्यत तयारी सुरू असून नुकतंच त्याची होणारी पत्नी संजनाचा मेहेंदी सोहळा पार पडला. याचे फोटो समोर आले आहेत. संजनाच्या हातावर सूरजच्या नावाची मेहेंदी रंगली आहे. तिच्या मेहेंदीचं डिझाइनही फारच खास आहे.
संजनाच्या हातावर हत्ती, मोर असं खास डिझाइन काढण्यात आलं आहे. त्यासोबतच संजना आणि सूरजचं नावही मेहेंदीमध्ये लिहिलं गेलं आहे. तिच्या मेहेंदीमध्ये आणखी एक गोष्ट खास आहे. संजनाच्या हातावर काढलेल्या मेहेंदीत सूरजचा फेमस डायलॉग लिहिण्यात आला आहे. "झापुक झुपूक" असं तिच्या हातावर काढलेल्या मेहेंदीत लिहिलं आहे. दोघांच्याही घरी लग्नापूर्वीच्या विधींना सुरुवात झाली आहे. संजनाच्या घरी घाणा भरण्याचा कार्यक्रमही पार पडला आहे.

सूरज आणि संजनाचं लव्ह मॅरेज आहे. संजना ही सूरजच्या मामाच्या मुलगी आहे. सूरज गोफणे घराण्याचा जावई होणार आहे. २९ नोव्हेंबरला सासवड-जेजुरी येथे संजना-सूरजचा लग्नसोहळा पार पडणार आहे. संध्याकाळी ६ वाजून ११ मिनिटांनी सूरज लग्नबंधनात अडकून नव्या आयुष्याला सुरुवात करणार आहे.