"माझं पण ठरलं...", सूरज चव्हाणनंतर घनश्याम दरवडेची लगीनघाई? छोटा पुढारीला हळद लागली
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2025 15:55 IST2025-12-08T15:55:00+5:302025-12-08T15:55:36+5:30
सूरजनंतर आता बिग बॉस मराठी फेम छोटा पुढारी म्हणजेच घनश्याम दरवडेही बोहल्यावर चढण्याच्या तयारीत आहे की काय, असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. घनश्यामने शेअर केलेल्या एका व्हिडीओमुळे या चर्चा रंगल्या आहेत.

"माझं पण ठरलं...", सूरज चव्हाणनंतर घनश्याम दरवडेची लगीनघाई? छोटा पुढारीला हळद लागली
बिग बॉस मराठी ५चा विजेता असलेला सूरज चव्हाण नुकताच विवाहबंधनात अडकला आहे. सूरजचा लग्नसोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला. त्याच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. सूरजनंतर आता बिग बॉस मराठी फेम छोटा पुढारी म्हणजेच घनश्याम दरवडेही बोहल्यावर चढण्याच्या तयारीत आहे की काय, असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. घनश्यामने शेअर केलेल्या एका व्हिडीओमुळे या चर्चा रंगल्या आहेत.
घनश्यामने त्याच्या इन्स्टाग्रामवरुन एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत घनश्यामच्या अंगाला हळद लागत असल्याचं दिसत आहे. घनश्यामची आई त्याला हळद लावत आहे. त्यानंतर घनश्याम लग्नासाठी कपडेही खरेदी करत असल्याचं दिसत आहे. हा व्हिडीओ शेअर करत घनश्याम म्हणतो, "हळद लागली एकदाची.. माझं पण ठरलं बरका...यायला लागतंय". त्यामुळे सूरजनंतर आता घनश्यामही लग्नाच्या बेडीत अडकणार का? त्याची नवरी कोण असेल? अशा कमेंट चाहत्यांनी त्याच्या व्हिडीओवर केल्या होत्या.
मात्र असं काहीच नाहीये. घनश्यामने शेअर केलेल्या व्हिडीओत पुढे दिसतंय की तो झोपेत त्याच्या लग्नाचं स्वप्न बघत आहे. आणि नंतर त्याची आई त्याला झोपेतून उठवत असल्याचं दिसत आहे. त्यामुळे घनश्यामचं लग्न हे खरंखुरं होत नाहीये. तर हे रील त्याने मजा म्हणून बनवलं आहे. पण या रीलमुळे खऱ्या आयुष्यात घनश्याम लग्न कधी करणार? असा प्रश्न आता चाहते विचारत आहेत.