Bigg Boss Marathi 6: "तोंड शेणात घाल"; घरात पहिल्याच दिवशी रुचिता आणि तन्वीमध्ये जोरदार राडा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2026 11:52 IST2026-01-12T11:50:48+5:302026-01-12T11:52:25+5:30
'बिग बॉस मराठी ६'ला सुरुवात झाली आहे. घरात पहिल्याच दिवशी स्पर्धकांमध्ये जोरदार राडा बघायला मिळतोय. प्रोमो बघाच

Bigg Boss Marathi 6: "तोंड शेणात घाल"; घरात पहिल्याच दिवशी रुचिता आणि तन्वीमध्ये जोरदार राडा
'बिग बॉस मराठी ६'चा ग्रँड प्रिमिअर काल पार पडला. आधीच्या सीझनप्रमाणे या नव्या सीझनचं सूत्रसंचालनही रितेश देशमुखने केलं. एकापेक्षा एक स्पर्धक 'बिग बॉस मराठी ६'मध्ये सहभागी आहेत. अशातच आज 'बिग बॉस मराठी ६'च्या पहिल्याच दिवशी स्पर्धकांमध्ये जोरदार वाद झालेला बघायला मिळाला. तन्वी कोलते आणि रुचिता जामदार यांच्यात शाब्दिक चकमक झाली. काय घडलं नेमकं? जाणून घ्या.
तन्वी - रुचितामध्ये मोठा वाद
'बिग बॉस मराठी ६'च्या नवीन प्रोमोत दिसतंय की, करण सोनावणे आणि रुचिता जामदार हे गप्पा मारत बसलेले असतात. तेव्हा करण तन्वीला उद्देशून रुचिताला काहीतरी सांगत असतो. हे ऐकताच तन्वी तिथे येते. ''तू फालतू मत बोलू नको'', असं तन्वी करणला सांगते. पुढे रुचिताही रागावते. ती म्हणते, ''तुम्ही शस्त्र घेऊन तयारच राहा कोण काय बोलतंय हे बघत राहा.'' पुढे तन्वीचाही आवाज वाढतो. दोघांचा वाद टोकाला जातो. शेवटी रुचिता तन्वीला रागाच्या भरात, ''तुझं तोंड शेणात घाल'', असं म्हणते. सचिन कुमावत दोघींचं भांडण सोडवण्याचा प्रयत्न करताना दिसतो.
अशाप्रकारे 'बिग बॉस मराठी ६'च्या पहिल्याच दिवशी सदस्यांमध्ये राडे बघायला मिळायले. आता तन्वी आणि रुचिताचं भांडण कोणत्या टोकाला जाणार याकडे सर्वांचं लक्ष आहे. दरम्यान आज 'बिग बॉस मराठी ६'च्या घरात बझर वाजवून कोणीच तुफान थांबवण्याचा प्रयत्न न केल्याने सर्वांसाठी घर बंद करण्यात आलं आहे. पुढील दोन-तीन दिवसांत घरात पहिला नॉमिनेशन टास्क पार पडणार आहे. त्यात कोण नॉमिनेट होईल, याची सर्वांना उत्सुकता आहे.