तारीख ठरली, वेळ बदलली? 'या' दिवशी सुरु होणार 'बिग बॉस मराठी ६'; पाहा प्रोमो
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2025 10:41 IST2025-12-14T10:40:49+5:302025-12-14T10:41:53+5:30
Bigg Boss Marathi 6: 'मागचा सीझन वाजवलाय, यंदाचा गाजवायचाय...आहात ना तय्यार! 'नव्या प्रोमोने बिग बॉस मराठीच्या नव्या सीझनचा बिगुल वाजला आहे.

तारीख ठरली, वेळ बदलली? 'या' दिवशी सुरु होणार 'बिग बॉस मराठी ६'; पाहा प्रोमो
Bigg Boss Marathi 6: बिग बॉस मराठी ६ कधी सुरु होणार याची सर्वांनाच उत्सुकता होती. काही दिवसांपूर्वी हिंदी 'बिग बॉस सीझन १९' च्या फिनालेमध्ये रितेश देशमुखने हजेरी लावत 'बिग बॉस मराठी ६'ची घोषणा केली. यासोबत रितेशच यावेळीही होस्ट असणार हे कन्फर्म झालं. तर आता 'बिग बॉस मराठी ६'कधीपासून सुरु होणार? याची तारीखही समोर आली आहे. कलर्स मराठी वाहिनीने नवा प्रोमो शेअर करत तारीख आणि वेळ जाहीर केली आहे.
'स्वागताला दारं उघडी ठेवा! मी येतोय', असं म्हणत रितेश देशमुख घेऊन येत आहे बिग बॉस मराठी सीझन ६. रितेश भाऊंचा मस्त लूक, दमदार स्वॅग प्रेक्षकांची मने जिंकत आहे. 'मागचा सीझन वाजवलाय, यंदाचा गाजवायचाय...आहात ना तय्यार!' भाऊच्या या वाक्याने प्रेक्षकांची धडधड अजूनच वाढली आहे. नव्या सीझनची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. मागील सीझनने जबरदस्त धुमशान घातलं आणि यंदाच्या सीझनमध्येही तोच स्वॅग असणार आहे, पण पॅटर्न रितेश भाऊंचा असणार आहे. काय पॅटर्न असणार? कसा लूक असणार? सदस्य कोण असणार? सगळं अजून गुलदस्त्यात आहे. 'बिग बॉस मराठी सीझन ६' येत्या ११ जानेवारीपासून सुरु होत आहे. कलर्स मराठीने प्रोमो शेअर करत ही गुडन्यूज दिली आहे.
भाऊच्या एंट्रीसाठी उभारलेला आलिशान सेट, भव्य मिरवणुकीचे वातावरण, ढोल–ताशांचा गजर, रंगीबेरंगी रोषणाई आणि तब्बल २५० ते ३०० लोकांची दणदणीत उपस्थिती या सगळ्यांच्या साक्षीने बिग बॉस मराठीच्या नव्या सीझनचा लार्जर-दॅन-लाईफ प्रोमो पार पडला. रितेश भाऊने पहिल्यांदाच प्रोमोमध्ये पारंपरिक वेशभूषा केली आहे. प्रत्येक फ्रेममध्ये त्याचा दिसणारा स्वॅग प्रेक्षकांची मने जिंकत आहे. या नव्या प्रोमोने बिग बॉस मराठीच्या नव्या सीझनचा बिगुल वाजला आहे. दरम्यान, सगळीकडे चर्चांना उधाण आले आहे आणि चर्चेत आहेत प्रोमोमधले रितेश भाऊंचे कडक डायलॉग... घरात कुणाचा नवस पूरा होणार? तर कुणाच्या सलामीने वातावरण झिंगणार? “काही असेही असणार… पण, मी गप्प नाही बसणार...! अशा आणि अनेक प्रश्नांची उत्तरं मिळणार आहेत लवकरच!
या सीझनमुळे लागणार महाराष्ट्राला वेड... सज्ज व्हा! बिग बॉस मराठी सीझन ६ - ११ जानेवारीपासून दररोज रात्री ८ वा. कलर्स मराठी आणि JioHotstar वर! दरम्यान बिग बॉसच्या सहाव्या सीझनची वेळ बदललेली दिसत आहे. रात्री ९ ऐवजी आता रात्री ८ वाजता बिग बॉस पाहता येणार आहे. वेळ बदलल्याने काही प्रेक्षकांनी कमेंट करत नाराजी व्यक्त केली आहे.