Bigg Boss Marathi: लावणी डान्सरला 'बिग बॉस मराठी'ची ऑफर? म्हणाली- "मला त्यांच्याकडून मेल आलाय..."
By कोमल खांबे | Updated: December 23, 2025 10:16 IST2025-12-23T10:15:34+5:302025-12-23T10:16:37+5:30
'बिग बॉस मराठी'च्या यंदाच्या सीझनमध्ये तरी गौतमी पाटील दिसणार नाही. पण, एका लावणी डान्सरची 'बिग बॉस मराठी ६'मध्ये वर्णी लागण्याची शक्यता आहे.

Bigg Boss Marathi: लावणी डान्सरला 'बिग बॉस मराठी'ची ऑफर? म्हणाली- "मला त्यांच्याकडून मेल आलाय..."
Bigg Boss Marathi : बिग बॉस हिंदीचा सीझन संपल्यानंतर आता चाहत्यांना 'बिग बॉस मराठी ६'ची उत्सुकता आहे. 'बिग बॉस मराठी'च्या नव्या सीझनचा प्रोमोही प्रदर्शित करण्यात आला आहे. 'बिग बॉस मराठी ५'प्रमाणे 'बिग बॉस मराठी ६'चं सूत्रसंचालनही रितेश देशमुख करणार आहे. या नव्या सीझनमध्ये कोणते स्पर्धक दिसणार, याबाबत सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगल्याचं पाहायला मिळत आहे. अनेक नावंही समोर आली आहेत.
'बिग बॉस मराठी ६'मध्ये गौतमी पाटील दिसणार असल्याची चर्चा रंगली होती. गौतमीला 'बिग बॉस मराठी'ची ऑफरही होती. मात्र गौतमीने यावर स्पष्टीकरण देत 'बिग बॉस मराठी'ची ऑफर नाकारल्याचं आणि शोमध्ये सहभागी होणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. त्यामुळे 'बिग बॉस मराठी'च्या यंदाच्या सीझनमध्ये तरी गौतमी पाटील दिसणार नाही. पण, एका लावणी डान्सरची 'बिग बॉस मराठी ६'मध्ये वर्णी लागण्याची शक्यता आहे. 'बिग बॉस मराठी'च्या टीमकडून लावणी डान्सर सायली पाटीलला ऑफर मिळाली आहे.
सायली पाटीलचा एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये ती म्हणते, "मला बिग बॉस मराठीकडून दोन दिवसांपूर्वी मेल आलाय. तुम्ही इंटरेस्टेड आहात का? असा मेल आलाय. तर मी काय करू? मी बिग बॉसमध्ये जायला हवं का की नको? तुम्हाला काय वाटतं? तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा". सायलीचा हा व्हिडीओ तिच्या एका फॅन पेजवरुन शेअर करण्यात आला आहे. पण, तिच्या मेन अकाऊंटवर हा व्हिडीओ दिसत नाही. त्यामुळे तिला खरंच 'बिग बॉस मराठी'च्या टीमकडून विचारणा झाली का, याबाबतही चर्चा रंगली आहे.
कोण आहे सायली पाटील?
सायली पाटील ही एक लावणी डान्सर आहे. गौतमी पाटीलप्रमाणेच तीदेखील लोकप्रिय असून डान्सचे शो करते. सायलीचे रीलही प्रचंड व्हायरल होतात. तर इन्स्टाग्रामवर तिचे ८४ हजार फॉलोवर्स आहेत.